OnePlus Mobile Symbolic Image Dainik Gomantak
अर्थविश्व

OnePlus Nord 2चे काही तासांत लॉंचींग; 'ही' आहेत वैशिष्ट्ये

OnePlusच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मिळालेल्या माहितीनुसार Warp Charge 65 ही Fast Chargingची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.

दैनिक गोमन्तक

OnePlus किंवा नवनवीन मोबाईल विकत घेण्यासाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांसाठी ही बातमी आनंदाची आहे. OnePlus Nord 2 5G उद्या 22 जुलै रोजी भारतात लॉन्च होणार आहे. आपला हा नवा फोन लॉंच करण्यापुर्वी कंपनीने बॅटरी आणि वेगवान चार्जिंग सुविधेची वैशिष्ट्ये ग्राहकांसमोर ठेवली आहेत. One Plusने आधीच आपल्या या मिड-रेंज स्मार्टफोनच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली आहे. बाजारात येणाऱ्या या नव्या फोनची किंमत देखील कमी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. वनप्लस नॉर्ड 2 ब्ल्यु हेझ (Blue Haze), ग्रे सिएरा (Gray Sierra), ग्रीन वुड्स, (Green Woods) आणि रेड कलर (Red colour) असे चार कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. (OnePlus Nord 2 will launch on July 22; Learn about the features of OnePlus Nord 2 5G)

OnePlusच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मिळालेल्या माहितीनुसार हा फोन 4,500mAhची बॅटरी आणि Warp Charge 65 या Fast Chargingच्या सुविधेसह उपलब्ध असणार आहे. या ट्विटमध्ये असा उल्लेखही करण्यात आला आहे की, वॉरप चार्ज 65 मुळे स्मार्टफोन केवळ 15 मिनिटांत फुल चार्ज होते जी पुर्ण दिवस पुरेल.

OnePlus Nord 2 मध्ये एक 90Hz रीफ्रेश रेटसह एक 6.43 इंच AMOLED डिस्प्ले HDR10 + सर्टिफिकेशनसह मिळणार असल्याची शक्यता आहे. तर या स्मार्टफोनच्या किंमतीही लीक झाले असून त्याचा बेस मॉडेल 8GB+128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत रु. 31,999 तर, 12GB +256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत रु. 34,999 असणार असल्याचे समजते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT