Elon Musk Dainik Gomantak
अर्थविश्व

ट्विटर डील होल्डवर, एलन मस्कची मोठी घोषणा

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon
Musk) यांनी सांगितले की, ट्विटर विकत घेण्याचा करार तात्पुरता थांबवण्यात आला. गेल्या महिन्यात, मस्कने $44 बिलियनमध्ये ट्विटर खरेदी करण्याची घोषणा केली आहे. एलन मस्क यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. (On twitter deal hold Elon Musks big announcement)

मस्क म्हणाले की, मायक्रोब्लॉगिंग साइटच्या एकूण युजरबेसमध्ये स्पॅम किंवा बनावट खाती 5 टक्क्यांहून कमी असल्याचे आढळून येईपर्यंत हा करार थांबवण्यात आला. ट्विटर विकत घेण्यासाठी त्यांनी 19 गुंतवणूकदारांकडून 7 अब्ज डॉलर म्हणजेच 50 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे.

एलन मस्क यांनी ट्विट करत सांगितले आहे की, ट्विटर डील तात्पुरती होल्डवर ठेवण्यात आली आहे. स्पॅम आणि बनावट खात्यांमुळे हा करार थांबवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ट्विटरने अलीकडेच माहिती दिली होती की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फक्त 5 टक्के स्पॅम किंवा बनावट खाती उघडण्यात आली आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 229 दशलक्ष वापरकर्ते असल्याचे सांगितले आहे.

एलन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर ट्विटर बोर्डात गोंधळ उडाल्याचे दृश्य होते. ट्विटरवरून दोन कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे तर काढून टाकलेल्या दोन कर्मचार्‍यांमध्ये ट्विटरचे महाव्यवस्थापक कायवान बॅकूर आणि कंपनीचे महसूल आणि उत्पादन प्रमुख ब्रूस फॉक यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bank Scam: गोवा राज्य बँक घोटाळा! ठोस पुराव्यांअभावी वेळीपांसह सर्व संशयित दोषमुक्त

Arpora Sarpanch: बर्च क्लब अग्नितांडवप्रकरणी नवीन अपडेट! भूमिगत माजी सरपंच न्यायालयासमोर हजर; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलचे काय होणार? संपूर्ण राज्याचे लक्ष चिंबलकडे; लढ्यासाठी ग्रामस्थ सज्ज

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

SCROLL FOR NEXT