Indian Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Old Pension Scheme: लाखो कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, जुनी पेन्शन योजना झाली लागू

Old Pension Scheme: पेन्शन व्यवस्थेबाबत देशात चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

Old Pension Scheme: पेन्शन व्यवस्थेबाबत देशभरात चर्चा सुरु आहे. दरम्यान, राज्य सरकारने जुनी पेन्शन पद्धत लागू केल्याने राज्य सरकारचे लाखो कर्मचारी सुखावले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना भेट दिली आहे.

पंजाब सरकारने दिली आनंदाची बातमी

पंजाब सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना सुरु केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी जुनी पेन्शन योजना अधिसूचित करण्यात आल्याची घोषणा केली. आतापासून सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

जुनी पेन्शन प्रणाली निवडण्याचा पर्याय असावा

पंजाब सरकारने सांगितले की, महिनाभरापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या निर्णयावर चर्चा झाली होती. यासोबतच कर्मचाऱ्यांना (Employees) जुन्या पेन्शन पद्धतीचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, असे राज्याचे अर्थमंत्री म्हणाले.

जुन्या पेन्शनमध्ये अधिक फायदा आहे

पंजाबसह अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलनेही केली जात आहेत. कर्मचाऱ्यांचा असा विश्वास आहे की, त्यांना त्यांच्या नवीन पेन्शन प्रणालीपेक्षा जुन्या पेन्शन योजनेत अधिक लाभ मिळत आहेत. यासोबतच जुन्या पेन्शन पद्धतीत कर्मचाऱ्यांचे भविष्य अधिक सुरक्षित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Fixing: टी-20 विश्वचषकापूर्वी मोठा धक्का! 'या' स्टार फलंदाजावर फिक्सिंगचा आरोप, 'ICC'कडून तत्काळ निलंबन

Goa Drug Bust: कळंगुट पोलिसांची मोठी कारवाई; सिकेरीत 'इतक्या' लाखांच्या गांजासह पश्चिम बंगालचा तस्कर गजाआड

Ajit Pawar: "हो ला हो अन् नाही ला नाही" सांगणारा सिंह हरपला! गडकरींनी सांगितला अजितदादांच्या रोखठोक निर्णयांचा किस्सा

Ajit Pawar Funeral: महाराष्ट्र पोरका झाला! 'अजित दादा' अनंतात विलीन; मुख्यमंत्री सावंतांनी साश्रू नयनांनी वाहिली श्रद्धांजली

Shocking News: क्रिकेटविश्वात खळबळ! दिल्लीच्या खेळाडूंकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड

SCROLL FOR NEXT