Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Old Pension Scheme बाबत सरकारचा 'हा' नवा फॉर्म्युला! कर्मचाऱ्यांची चांदी

OPS: नुकतेच हरियाणातील शेकडो माजी आणि वर्तमान कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने केली.

Manish Jadhav

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीवरुन सुरु असलेले युद्ध अधिक तीव्र होत आहे. नुकतेच हरियाणातील शेकडो माजी आणि वर्तमान कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने केली. जुनी पेन्शन पूर्ववत करण्याची या कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांची मागणी होती.

यापूर्वी, अनेक राज्य सरकारांनी जुनी पेन्शन बहाल केली आहे. जुनी पेन्शन बहाल करणारे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नुकतीच एका मुलाखतीदरम्यान देशभरात ती बहाल करण्याची मागणी केली होती.

पक्षपातळी सोडून निवेदन दिले

आता जुन्या पेन्शनच्या मागणीत मोठी सुधारणा अशा वेळी आली आहे, जेव्हा मध्यप्रदेशात भाजपचे (BJP) आमदार गौरीशंकर बिसेन यांनी वक्तव्य केले. माजी कृषिमंत्री बिसेन यांनी आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी ते म्हणाले की, जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी.

हमी पेन्शन 50% दराने दिली जाईल

दुसरीकडे, सूत्रांनी दावा केला आहे की, मोदी सरकार जुन्या पेन्शनच्या मागणीवर मध्यम मार्ग शोधण्याचा विचार करत आहे. पहिला पर्याय म्हणून, सरकारी कर्मचार्‍यांना NPS अंतर्गत मिळालेल्या शेवटच्या पगाराच्या सुमारे 50% हमी पेन्शन द्यावी, असा सरकारकडून (Government) विचार केला जात आहे. या नियमाच्या अंमलबजावणीमुळे, सरकारी तिजोरीवर जास्त बोजा न पडता सध्याच्या NPS मध्ये बदल करता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT