Ola Electric Scooter बाजारात कधी येणार हे अखेर ठरलंय! स्कूटरच्या लॉन्चची तारीख आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे. 15 ऑगस्ट 2021 देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिनी Ola भारतीय बाजारात नवीन स्कूटर लाँच करणार आहे. Ola समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष भाविश अग्रवाल यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. Ola Electric Scooter एक दोन नव्हे तर, 10 वेगवेगळ्या रंगांमध्ये बाजारात येणार आहे. ईव्ही मॅट आणि ग्लॉस शेड्समध्ये लॉन्च केली जाईल ज्यामध्ये काळा आणि निळा, चमकदार लाल, गुलाबी आणि पिवळा आणि पांढरा आणि सिल्व्हर या रंगांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ही इलेक्ट्रिक स्कूटर डीलरशिपला नाही तर थेट प्रोडक्शन प्लांटमधून ग्राहकांना देण्याचा विचार करत आहे. सध्याची परिस्थिती पाहता किंमतींमधील फरक दूर करण्यासाठी कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेऊ शकते. विशेष गोष्ट म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटरमुळे ग्राहकांना वारंवार डीलरशिपला जावे लागणार नाही.
OLAचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी शुक्रवारी संध्याकाळी ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सला विचारले की त्यांना ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी स्टोअरमध्ये जायचे आहे की ऑनलाईन खरेदी करून घरी पाहीजे आहे. याला उत्तर देताना, बहुतांश लोकांनी त्यांना स्कूटर ऑनलाईन माध्यमातून खरेदी करुन थेट घरी पाहिजे आहे. त्यांच्या या प्रश्नावर सुमारे 4,500 लोकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.
OLAने इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग फक्त 499 रुपयांपासुन सुरू केली आहे, त्यानंतर पुढच्या 24 तासात 1 लाखांहून अधिक ग्राहकांनी बुकिंग केली. अधिकृत दाव्यानुसार, ओला स्कूटर फक्त 18 मिनिटांत 0 ते 50% पर्यंत चार्ज होऊ शकते. तर चार्जिंग रेंज एका चार्जमध्ये 150 किमी पर्यंत असेल. म्हणजेच, स्कूटर फक्त 18 मिनिटांच्या चार्जिंगवर 75 किमी पर्यंत चालणार आहे. भारतीय बाजारात ही स्कूटर Ather 450X आणि TVS iQube शी स्पर्धा करणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.