Ola e-car  Dainik Gomantak
अर्थविश्व

Ola Electric Car: येत आहे ओला कंपनीची ई-कार ,15 ऑगस्टला होणार लॉचिंग

गोमन्तक डिजिटल टीम

ईलेक्ट्रिक बाईक बनविणारी ओला कंपनी आता त्यांची ई-कार (Ola Electric Car) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ओला कंपनी येत्या 15 ऑगस्टला आपली पहिली ईलेक्ट्रिक कार बाजारात घेऊन येण्याची शक्यता आहे. कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल (CEO Bhavish Aggarwal) यांनी याबाबत ट्विटर वरती माहिती दिली आहे. ओलाच्या ई-बाईकची मार्केटमध्ये अधिक मागणी आहे. त्यात आता कंपनीची ई-कार येत असल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे.

भावेश अग्रवाल यांनी ट्विटमध्ये कार बाबत अधिक माहिती दिलेली नाही. मात्र, कार बाबत ओला कंपनीच्या चाहत्यांना काही हिंट दिल्या आहेत. त्यामुळे कंपनी ग्राहकांसाठी काय खास घेऊन येणार हे पाहणं म्हत्वाचे ठरणार आहे. "ओलाचे नवीन उत्पादन बाजारात घेऊन येताना आनंद होत आहे. 15 ऑगस्टला हे उत्पादन बाजारात येईल. येत्या काळात भविष्यातील योजनांबाबत अधिक माहिती दिली जाईल. लाईव्ह स्ट्रिमचे वेळी आणि लिंक दिली जाईल." असे ट्विट भावेश अग्रवाल यांनी केले आहे.

दरम्यान, ओला कंपनीच्या ई - बाईकला (Ola E-Bike) बाजारात मोठी मागणी आहे. मागील काही दिवसांपूर्वी बाईक मधील काही तांत्रिक अडचणीचा भाग सोडता, ओला ई बाईक खरेदीला पंसदी देत आहेत. आता कंपनीची ई कार (Ola E-car) येत असल्याने काय नवीन फिचर, मायलेज, आणि लूक याबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. तसेच, बाजारात असलेल्या इतर ईलेक्ट्रिक कार सोबत ओलाची तगडी फाईट पहायला मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT