Wipro Work From Home Policy Dainik Gomantak
अर्थविश्व

Work From Home चे लाड बंद होताहेत! आठवड्यातून तीन दिवस ऑफिस बंधनकारक, विप्रोची कर्मचाऱ्यांना सूचना

Wipro ने आपल्या कर्मचार्‍यांना इशारा दिला आहे की, 15 नोव्हेंबरपासून कर्मचार्‍यांसाठी हायब्रीड वर्क पॉलिसी लागू केली जाईल. जर कोणी त्याचे पालन केले नाही तर 7 जानेवारी 2024 पासून त्याचे परिणाम भोगावे लागतील.

Ashutosh Masgaunde

Office mandatory for three days a week, Wipro's notice to employees:

भारतातील चौथी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी विप्रोने आपल्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. कर्मचार्‍यांना नवीन हायब्रीड वर्क पॉलिसीचे पालन करण्यास सांगितले आहे.

विप्रोकडून कर्मचाऱ्यांसाठी 15 नोव्हेंबरपासून हायब्रीड वर्क पॉलिसी लागू करण्यात येणार आहे. जर कोणी हे धोरण पाळले नाही तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील.

विप्रोने आपल्या कर्मचार्‍यांना इशारा दिला आहे की, 15 नोव्हेंबरपासून कर्मचार्‍यांसाठी हायब्रीड वर्क पॉलिसी लागू केली जाईल, जर कोणी सतत त्याचे पालन केले नाही तर 7 जानेवारी 2024 पासून त्याचे परिणाम भोगावे लागतील.

या धोरणानुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येऊन काम करावे लागणार आहे.

विप्रोने ही नवी पॉलीसी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर केली होती. कंपनी TCS आणि Infosys सारख्या कंपन्यांना फॉलो करते, ज्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना आठवड्यातून 5 दिवस आणि महिन्यातून 10 दिवस कार्यालयात येणे अनिवार्य कले आहे.

आयटी कंपन्या गेल्या दोन वर्षांत वर्क फ्रॉम होमची सवय झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिकाराशी झुंज देत आहेत. महामारीच्या काळात जवळपास दोन वर्षे घरून काम केल्यानंतर, आयटी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचा वर्क फ्रॉम होम सुविधा बंद करण्यास विरोध होत आहे.

कंपनीने म्हटले आहे की, त्यांचे सुमारे 55% कर्मचारी आधीच आठवड्यातून तीन वेळा कार्यालयात येत आहेत. आमचा विश्वास आहे की, आमच्या व्यावसायिक विकासासाठी तसेच ग्राहकांसाठी सतत नावीन्य आणण्यात आमच्या यशासाठी वैयक्तिक संवाद महत्त्वाचा आहे.

आयटी क्षेत्रात, कर्मचार्‍यांमध्ये अधिक टीमवर्कला प्रोत्साहन देण्यावर आणि गोपनीयतेसारख्या संवेदनशील बाबींवर कडक नियंत्रण ठेवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त दिवस कार्यालयात बोलवण्यावर भर देत आहे, असे विप्रोने पुढे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT