Wipro Fires 300 Employees: या दिग्गज IT कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Wipro Fires 300 Employees: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने आपल्या 300 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे.
Employees
EmployeesDainik Gomantak
Published on
Updated on

IT Company Fires 300 Employees: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या विप्रोने आपल्या 300 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. विप्रोमध्ये असताना हे कर्मचारी दुसऱ्या कंपनीसाठी काम करत होते, असा आरोप आहे. विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष ऋषद प्रेमजी म्हणाले, "या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळे आम्ही त्यांना मिळणाऱ्या सेवाही बंद केल्या होत्या.''

वृत्तानुसार, विप्रोने काही दिवसांपूर्वी मूनलाइटिंगबाबत इशारा दिला होता. मूनलाइटिंग म्हणजे एका वेळी एकापेक्षा जास्त गोष्टी करणे. सध्या बहुतांश कंपन्यांमध्ये घरुन काम सुरु आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी अशा प्रकारची कामे करत आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांना (Employees) पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, 'मूनलाइटिंग'ला परवानगी नाही. कराराचा कोणताही भंग शिस्तभंगाच्या कारवाईच्या अधीन असेल.'

Employees
Money Saving| PPF, EPF किंवा पोस्ट ऑफिसमधील कुठे जमा होतो तो निधी, ज्यावर कोणी दावा करत नाही!

कोणत्या कंपन्या 'मूनलाइटिंग'ला परवानगी देतात?

गेल्या महिन्यात, ऑन-डिमांड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी एक नवीन "मूनलाइटिंग" धोरण सादर केले. जे त्यांना अधिक पैसे कमावण्यासाठी मुभा देते. स्विगीचे प्रमुख गिरीश मेनन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “मूनलाइटिंग पॉलिसीसह, कर्मचाऱ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा आमचा हेतू आहे. जागतिक दर्जाची 'पीपल फर्स्ट' संस्था निर्माण करण्याच्या दिशेने आमचे हे आणखी एक मोठे पाऊल आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com