Now you can transfer money without internet
Now you can transfer money without internet Dainik Gomantak
अर्थविश्व

आता इंटरनेटशिवाय करु शकता पैसे ट्रान्सफर

दैनिक गोमन्तक

स्मार्टफोनमधून यूपीआयद्वारे आपण एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाते. पेटीएमपासून गुगल पे(Google Pay), अॅमेझॉन पे (Amazon Pay) आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) पर्यंत ही सर्व अॅप्स (App) बँकिंग व्यवहारांसाठी युपीआयवर (UPI) अवलंबून असतात. पण असे एक तंत्रज्ञान देखील आहे ज्यात UPIद्वारे निधी ट्रान्सफर करण्यासाठी मोबाइल अॅपची (Mobile App) आवश्यकता नाही.

USSD2.0 नावाचे तंत्रज्ञान मोबाइल वापरकर्त्यांना इंटरनेटशिवाय पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. ही सेवा खास अशा वापकर्त्यांसाठी आणली गेली आहे, जे स्मार्टफोन नसून कीपॅडसह फीचर फोन करतात. तुम्हाला फक्त एक् कोड डायल करायचा आहे, आणि पैसे काही टप्प्यांमध्ये हस्तांतरीत केले जातील. आपण कोणत्याही अॅपशिवाय आणि इंटरनेटशिवाय पैसे कसे पाठवू शकता हे जाणून घेवूया.

* इंटरनेटशिवाय पैसे कसे पाठवाल

* तुमच्या बँक खात्यात नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन *99# डायल करा.

* नंतर तुमचे बँक खाते निवडा.

* प्रथम वापरत असल्यास, आता आपल्या डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक टाका.

* आता तुमच्या डेबिट कार्डची एक्सपायरी डेट टाका.

* आता UPIपिन तपासा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आपली सेवा सुरू होईल.

* पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून *99# डायल करा.

* पैसे पाठवण्यासाठी, 1 बटन दाबा आणि सेंड या ऑप्शनवर क्लिक करा.

* आता ऑप्शन सिलेक्ट करा ज्याद्वारे पैसे पाठवायचे आहेत. मोबाइल नंबरसाठी1 , UPI IDसाठी 3, सेवेच्या लाभासाठी 4 आणि IFCSसाठी 5 निवडा.

* आता तुम्हाला पाठवायची रक्कम एंटर करा आणि नंतर तुमचा UPIपिन टाइप करा.

* एकदा ट्रान्सफर पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला कन्फर्मेशनचा मॅसेज मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT