Indian Railways Dainik Gomantak
अर्थविश्व

आता ATM मधूनही बुक करता येणार रेल्वे तिकीट, कसे ते वाचा

आता आपल्याला रेल्वेच्या (Indian Railways) तिकीट काउंटच्या लांब लाईनपासून मुक्ती मिळणार आहे.

दैनिक गोमन्तक

एटीएम (ATM) म्हणजे केवळ पैसे देणारे मशिन नाही. एटीएममध्ये आता तुमची अनेक दैनंदिन कामे करु शकता, विश्वास बसत नाही ना? पण आता तुम्हाला ATM मधून चक्क रेल्वे तिकीट काढण्याची एक सुविधा मिळणार आहे. त्यामुळे आता आपल्याला रेल्वेच्या (Indian Railways) तिकीट काउंटच्या लांब लाईनपासून मुक्ती मिळणार आहे. कारण आता तुम्ही घराबाहेर पडताच एटीएममधून रेल्वेचे तिकीट काढू शकता. यापेक्षा मोठी सोय काय असू शकते.

सर्व बँकांच्या (Banks) एटीएममध्ये अशी सुविधा उपलब्ध नसली तरी अनेक बँकांचा यात सहभाग आहे. पैसे काढण्यासाठी तुम्ही जे काही करता तसे तुम्हाला करावे लागेल. तुम्ही एटीएममध्ये जा, डेबिट कार्ड टाका, पिन सारखे आवश्यक तपशील टाका आणि त्वरित पैसे काढा. रेल्वेच्या तिकिटांसाठीही असेच काहीसे करावे लागेल.

काय करावे लागेल?

सर्वप्रथम तुम्हाला एटीएममध्ये तेथील, मशीनमध्ये डेबिट कार्ड घाला आणि पिन नंबर टाका. पिन टाकल्यानंतर मशीनच्या स्क्रीनवर काही पर्याय विचारले जातील. त्यातच रेल्वे आरक्षण आणि रेल्वे तिकीटाचा पर्याय आहे. वापरकर्त्याला तिकीट बुकिंगचा पर्याय निवडावा लागेल. हा पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला आणखी दोन पर्याय निवडण्यास सांगितले जाईल. प्रथम, सामान्य तिकीट, दुसरे-आरक्षण तिकीट जर तुम्हाला जनरल तिकीट हवे असेल तर तुम्हाला जनरलच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला प्रवासाची सुरुवात आणि गंतव्य ठिकाण याबद्दल विचारले जाईल, ज्याची माहिती प्रविष्ट करावी लागेल. तुम्हाला प्रवासाची तारीख देखील टाकावी लागेल. त्यानंतर सामान्य वर्गाचे तिकीट आरक्षित केले जाईल. यामध्ये तिकिटाचे मूल्य, बँक सेवा शुल्क डेबिट कार्डमधून वजा केले जाईल. तिकिटाची किंमत आणि बँकेचा सेवा शुल्क बँक आणि रेल्वे मंत्रालय एकत्रितपणे ठरवतात. एटीएममध्ये जाऊन तुम्ही हे तिकीट रद्दही करू शकता. पण हे लक्षात ठेवा की तिकीट नेहमी प्रवासाच्या तारखेपूर्वीच रद्द करावे लागेल. ज्या स्थानकावरून प्रवास सुरू करायचा आहे तेथेही हे बुकींग करता येईल.

आता याच्या दुसऱ्या पर्यायाबद्दल बोलूया, यामध्ये आरक्षित वर्गाची तिकिटे एटीएमद्वारे बुक केली जातात. यासाठी एटीएममध्ये पिन टाकल्यानंतर बुक तिकिटावर क्लिक करा. त्यानंतर आरक्षण तिकीटाचा पर्याय निवडा. सामान्य तिकिटाच्या तुलनेत हा पर्याय थोडा अवघड आहे. सर्वप्रथम, तुम्हाला प्रवासाच्या सुरुवातीच्या ठिकाणाचे आणि शेवटच्या स्थानकाचे नाव द्यावे लागेल. म्हणजेच बोर्डिंग आणि गंतव्य स्थानकांची नावे टाकावी लागतील. प्रवासाची तारीख देखील त्यामध्ये टाका. यासोबतच एक लिस्ट ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला ट्रेन आणि त्यातील रिकाम्या सीटची माहिती मिळेल.

वेटिंग तिकिटावर प्रवास करण्याची परवानगी

येथे एक समस्या असू शकते. एकापेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करायचा असेल तर एटीएमचा कीबोर्ड वापरून नाव टाकावे लागेल. अशी सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला डेबिट कार्डचा पिन कोड विचारला जाईल. ते प्रविष्ट केल्यावर तुमचे रेल्वे तिकीट आरक्षीत होईल. तुम्हाला हवे तेव्हा हे तिकीट तुम्ही एटीएममधूनही रद्द करू शकता. तुम्हाला एटीएममधून वेटिंग तिकीट मिळाले तरी ते काउंटरच्या तिकीटाइतकेच वैध असेल. ऑनलाइन वेटिंग तिकीट कन्फर्म न झाल्यास ते रद्द होते, पण एटीएम तिकिटात असे काही होत नाही. जर तिकीट नॉन-एसी असेल तर ते रद्द केले जात नाही आणि प्रवासाला परवानगी आहे. पण एसी तिकीट वेटिंगवर असेल तर त्यावर प्रवास करता येणार नाही. तुम्ही या तिकिटाची मुद्रित प्रत काढू शकता. त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरही येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT