भारतीय रेल्वे  Dainik Gomantak
अर्थविश्व

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; आता आरक्षणाशिवाय करा रेल्वे प्रवास

1 मार्चपासून रद्द झालेल्या 100 गाड्या सुरू होणार तर, 7 मार्चपासून धावणार आणखी 250 विशेष गाड्या आहेत

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: होळीपूर्वी यूपी, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड सह अनेक राज्यांतील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेकडून एक आनंदाची बातमी आली आहे. धुक्यामुळे रद्द करण्यात आलेल्या सर्व गाड्या मंगळवार, १ मार्चपासून त्या सर्व गाड्या धावतील, हिवाळ्यात धुक्यामुळे रेल्वेने 100 हून अधिक गाड्या रद्द केल्या होत्या, मात्र आता या सर्व गाड्या पूर्वीप्रमाणेच धावणार आहेत. यासोबतच होळीच्या दिवशी 250 विशेष गाड्याही चालवण्यात येणार आहेत.(Now travel by train without reservation)

यामुळे होळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत घरी जाणाऱ्या रेल्वे (Railway) प्रवाशांना तिकीट काढणे सोपे होईल, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. एवढेच नाही तर होळीसाठी रेल्वे अडीचशे विशेष गाड्याही चालवणार आहे. या गाड्यांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाड्या 7 मार्च ते 20 मार्च दरम्यान धावणार आहेत.

1 मार्चपासून रद्द झालेल्या 100 गाड्या धावण्यास सुरुवात होणार आहे

तथापि, विशेष गाड्यांचे भाडे इतर मेल एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यापेक्षा 30 टक्के जास्त असेल. पण, या गाड्या प्रवाशांसाठी होळीची सुट्टी साजरी करण्यासाठी खूप मदत करणार आहेत. कोविड-19 पासून रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.

7 मार्चपासून आणखी 250 विशेष गाड्या धावणार आहेत

हिवाळ्यातही धुक्यामुळे गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. पण, आता या सेवा सामान्य झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठी मदत होणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT