Now buy pizza and coffee on bitcoin Dainik Gomantak
अर्थविश्व

आता बिटकॉइनवर खरेदी करा पिझ्झा आणि कॉफी

ग्राहक आता बिटकॉईन (Bitcoin) वरून रोजच्या वापरातील वस्तू, पिझ्झा(Pizza), आइस्क्रीम (Ice-cream) आणि कॉफी (Coffee) खरेदी करू शकतील.

दैनिक गोमन्तक

भारतातील सर्वात जुने क्रिप्टो वॉलेट, युनोकॉईनने (Uno coin) लोकांसाठी एक नवीन सुविधा आणली आहे. कंपनीने भारतातील (Indian Market) ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. ग्राहक आता बिटकॉईन (Bitcoin) वरून रोजच्या वापरातील वस्तू, पिझ्झा(Pizza), आइस्क्रीम (Ice-cream) आणि कॉफी (Coffee) खरेदी करू शकतील. जगातील सर्वात मोठी आणि सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइनसह, आपण या गोष्टी खरेदी करू शकाल.अशी माहिती युनोकॉईनने दिली आहे. (Now buy pizza and coffee on bitcoin)

काय आहे नेमकी ही सुविधा

या सुविधेअंतर्गत, तुम्हाला बिटकॉइनमधून व्हाउचर खरेदी करावे लागणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही या व्हाउचरमधून वस्तू खरेदी करू शकाल. युनोकॉइन जे वापरकर्ते आहेत ते 90 ब्रँडचे गिफ्ट व्हाउचर वापरू शकतील. यामध्ये डॉमिनोज पिझ्झा, कॅफे कॉफी डे, बास्किन रॉबिन्स, हिमालय, प्रेस्टीज इत्यादींचा समावेश आहे. व्हाउचर खरेदी करण्यासाठी कंपनीने 100 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंतच्या बिटकॉइन्स उपलब्ध असणार आहेत .

कसे मिळू शकतील हे व्हाऊचर

जर तुम्हीही बिटकॉईन मध्ये गुंतवणूक केली असेल आणि व्हाउचर खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला युनोकॉईन अॅपमध्ये लॉग इन करावे लागेल जिथे तुम्हाला बीटीसी पेजवर जावे लागेल आणि होम पेजवर जाऊन 'शॉप' बटणावर क्लिक करावे लागेल.येथे तुम्हाला त्या सर्व ब्रॅण्डची माहिती मिळेल ज्यासाठी व्हाउचर खरेदी करता येतील. आता आपण ज्या ब्रँडमधून खरेदी करू इच्छिता तो निवडा आणि अॅपवर व्हाउचरचे मूल्य प्रविष्ट करा. व्हाउचर खरेदी केल्यावर त्याची रक्कम क्रिप्टो वॉलेटमधून कापली जाईल. आता वापरकर्त्याला एक व्हाउचर कोड मिळेल, ज्याचा वापर ब्रँडमधून खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

मात्र, यासाठी बिटकॉईन धारकांना युनोकॉईनसोबतची व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.कारण केवळ ज्या ग्राहकांनी केवायसी केली आहे केवळ अशाच ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल युनोकॉईनही कंपनी आठ वर्षांपूर्वी 2013 मध्ये देशात सुरू झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "पक्षांतरबंदी हेच माझं उत्तर..." असं का म्हणाले विजय सरदेसाई? 2027 पर्यंत काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचं केलं स्पष्ट

T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, टी-20 वर्ल्डकपचे शेड्यूल लवकरच होणार जाहीर, आयसीसी मुंबईत करणार मोठी घोषणा

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

SCROLL FOR NEXT