Adani Group  Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group: NDTV च नव्हे होस्टाईल टेकओव्हरची अनेक प्ररकणं आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

अदानी समूहाची (Adani Group) कंपनी 'एएमजी नेटवर्क लिमिटेड'ने (AMGNL) NDTV मधील 29.18 टक्के हिस्सा खरेदी करण्याचे सांगितले. तसेच, 26 टक्के शेअर्स खरेदीची खुली ऑफर दिली. यावर आता एनडीटीव्हीने स्पष्टीकरण दिले असून, चॅनलची हिस्सेदारी त्यांच्या परवानगी शिवाय घेतली जात असल्याचा खुलासा केला आहे. दरम्यान, या विषयातील जाणकार या सगळ्या प्रकाराला होस्टाईल टेकओव्हर (Hostile Takeover) असल्याचे म्हणत आहेत. पण, ही काय इतिहासातील पहिलीच घटना नाही.

मागील वर्षी अदानी मीडिया व्हेंचर्स लिमिटेडने मीडिया कंपनी क्यूबीएममध्ये (Quintillion Business Media Pvt Ltd) हिस्सेदारी विकत घेतली होती. त्याला देखील होस्टाईल टेकओव्हर म्हणून म्हटले जात होते. दरम्यान, भागविक्रीच्या वृत्तावर एनडीटीव्हीकडून स्पष्टीकरण्यात देण्यात आले की, ही खरेदी त्यांच्या इच्छेविरोधात आणि कोणतीही सूचना न देता केली जात आहे.

यापूर्वी झालेली होस्टाईल टेकओव्हरची प्रकरणं

इंडिया सिमेंट आणि रासी सिमेंट

प्रसिद्ध इंडिया सिमेंट (India Cements) या कंपनीने 1998 मध्ये राशी सिमेंटचा हिस्सा त्यांच्या संमतीशिवाय विकत घेतला. या खरेदीत रासी सिमेंटचे (Raasi Cements) 32 टक्के शेअर्सचे मालक बीव्ही राजू यांनी सर्व शेअर इंडिया सिमेंटला विकले. ही खरेदी होस्टाईल टेकओव्हरचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे म्हटले जाते.

लार्सन अँड टर्बो विरुद्ध माइंडट्री कंपनी

लार्सन अँड टर्बोने (Larsen and Toubro Ltd) 2019 मध्ये माइंडट्री (Mindtree Ltd) कंपनी विकत घेण्याची ऑफर दिली होती, परंतु कंपनीने ती नाकारली. त्यानंतर लार्सनने 4,998.82 कोटी रुपयांना माइंडट्री खरेदी करण्यासाठी खुल्या ऑफर अंतर्गत 31 टक्के शेअर्स खरेदी केले होते. त्यानंतर लार्सनने माइंडट्रीमध्ये एकूण 60 टक्के हिस्सेदारी घेऊन कंपनीचा ताबा घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT