Nokia X50 Pro Dainik Gomantak
अर्थविश्व

Nokia X50 Pro: नोकियाचा 'बाप' स्मार्टफोन येतोय; जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि रिलीज डेट

गोमन्तक डिजिटल टीम

स्मार्टफोन बाजारात नोकिया सर्वात पिछाडीवर असलेली कंपनी आहे. कधीकाळी किपॅडच्या दुनियेत बाप असणारी नोकिया स्मार्टफोनमुळे मागे पडली. पण, नोकिया पुन्हा बाजारात आपली दहशत निर्माण करण्यासाठी सज्ज झाली असून, नवे नवे स्मार्टफोन बाजारात घेऊन येत आहे. नोकियाचा नवा X50 प्रो लवकरच बाजारात येणार असून, याचे दमदार फिचर्स पुन्हा एकदा बाजारावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाले आहे.

Nokia X50 Pro 2022

नोकियाचा नवा कोरा X50 प्रो 10 आणि 12 रॅम आणि 256 व 512 रोम मेमरीसह उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता देखील अधिक असून, या फोनसाठी 6950 mAh एवढी बॅटरी क्षमता आहे. फोनची सात इंच मोठी स्क्रिन असून, अमोलेड डिस्पले आणि टचस्क्रिन आहे. तसेच, मोबाईलसाठी गोरीला ग्लासचे प्रोटेक्शन आहे. स्मार्टफोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेनरेशन 1 5G सपोर्ट देण्यात आला आहे. तर, यासाठी अड्रॉईड 12 ओएस देण्यात आली आहे.

Nokia X50 Pro

कॅमेरा

फोटोग्राफीचा उत्तम अनुभव मिळवायचा असेल तर, नोकियाचा नवा X50 प्रो बेस्ट फोन असेल. यात तुम्हा 200MP + 64MP + 48MP + 25MP कॅमेरा मिळेल. तसेच, 64MP सेल्फी कॅमेरा देखील मिळेल.

किंमत आणि रिलीज डेट

नोकियाचा X50 प्रो, 11 डिसेंबर रोजी ग्राहकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात त्याची प्रारंभिक किंमत 42,999 एवढी ठेवण्यात आली आहे. तर, बांग्लादेशमध्ये 48,999 आणि पाकिस्तानमध्ये हाच फोन 86,999 रूपयांना मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

Mumbai Indians: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! महेला जयवर्धनेनं सोडलं मुख्य प्रशिक्षकपद; IPL 2027 आधी मोठा बदल

Organic Agriculture: गोव्यात 10 टक्के क्षेत्रातही सेंद्रिय शेती नाही! रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सांगत उदय प्रभुदेसाई यांचे आवाहन

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT