Nokia T20 Launch Twitter
अर्थविश्व

Nokia T20: नोकिया टॅबलेट मोठा डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह लॉन्च

दैनिक गोमन्तक

Nokia T20 Specifications: इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन निर्माता कंपनी नोकियाने आपला नवीन टॅबलेट T20 चीनी बाजारात लॉन्च केला आहे. Nokia T20 टॅबलेट Octa core Unisoc T610 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. यासोबतच मोठ्या बॅटरीसह फास्ट चार्जिंग सपोर्टही उपलब्ध आहे. (Nokia T20 Launch)

दुसरीकडे, जर या टॅबलेटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या टॅबलेटचा 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरी वेरिएंट 1299 युआन म्हणजेच 15400 रुपये किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. हा टॅबलेट फक्त निळ्या रंगात बाजारात आला आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये हा टॅबलेट कंपनीने भारतीय बाजारात लॉन्च केला होता. भारतात, Nokia T20 वाय-फाय व्हेरिएंट 3 GB RAM सह 32 GB स्टोरेज वेरिएंटसाठी 15,499 रुपये आणि 4 GB RAM सह 64 GB स्टोरेज वेरिएंटसाठी 16,4999 रुपये किंमतीला लॉन्च करण्यात आला होता.

त्याशिवाय, Nokia T20 टॅबलेटमध्ये 8200 mAh बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याच वेळी, कनेक्टिव्हिटीसाठी, नोकिया टी20 मध्ये ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ, 3.5 मिमी हेडफोन जॅक, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट दिले गेले आहेत.

Nokia T20 मध्ये 10.4-इंचाचा 2K डिस्प्ले आहे, जो 2000x1200 रिझोल्यूशनसह येतो. याला 400 nits ब्राइटनेस देखील मिळतो, Nokia T20 मध्ये ऑक्टा कोअर Unisoc T610 प्रोसेसर आणि 4 GB पर्यंत RAM आहे. टॅबलेट Android 11 सह येतो आणि मायक्रो SD कार्डच्या मदतीने 512 GB पर्यंत वाढवता येतो. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर Nokia T20 मध्ये 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी 5 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT