SBI ग्राहकांसाठी खुशखबर! आजपासून FD वर मिळणार अधिक व्याज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्यानंतर आता बँकांनीही व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे.
RBI
RBI Dainik Gomantak
Published on
Updated on

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर आता बँकांनीही व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँक ठेवींवरील व्याजदरातही वाढ होत आहे. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) मुदत ठेवींवरील व्याजदरामध्ये वाढ केली आहे. (Good news for SBI customers You will get more interest on FD from today)

RBI
UIDAI ने केला इस्रोसोबत करार; घरी बसून जवळच्या आधार केंद्राची मिळवा माहिती

नवीन दर 15 जुलैपासून होणार लागू

केंद्रीय बँक ऑफ इंडियाचे नवे दर 15 जुलैपासून लागू होणार आहेत. बँकेने 2 कोटींपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरामध्ये वाढ केली आहे. बँकेने 1 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर 2 वर्षांपेक्षा कमी केले आहेत अशी माहिती सध्या समोर येत आहेत.

SBI चे नवीन व्याजदर

7 दिवस ते 45 दिवसात मुदत ठेवींवरील व्याजदर 3.50 टक्के असणार आहे. बँक 46 दिवस ते 179 दिवसांच्या कालावधीत मॅच्यूअर होणाऱ्या FD वर 4.00 टक्के व्याजदर देणार आहे. SBI 180 दिवसांपासून ते 210 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 4.25 टक्के व्याजदर देणार आहे, तर 211 दिवसांपासून ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्यूअर होणाऱ्या FD वर, बँकेने आपला व्याजदर 4.50 टक्के कायमच ठेवला आहे.

1 वर्षात मॅच्यूअर होणार्‍या परंतु 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर आता 5.25 टक्के व्याजदर मिळेल, जे पूर्वी 4.75 टक्के मिळत होते. बँक 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीतील मुदत ठेवींवर 4.25 टक्के आणि 3 वर्षे ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 4.50 टक्के व्याज देणार आहे.

RBI
इन्फोसिस विकत घेणार ही कंपनी इतक्या कोटींमध्ये डिल

आयडीबीआय बँकेनेही एफडीवरील व्याजदरात केली वाढ

खाजगी क्षेत्रातील आयडीबीआय बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीवरील व्याजदरामध्ये वाढ केली आहे. वाढलेले व्याजदर 14 जुलै 2022 पासून लागू देखील झाले आहेत. बँक 7 दिवस ते 30 दिवसात मॅच्यूअर होणाऱ्या ठेवींवर 2.70 टक्के व्याज दर देऊ करेल, तर 31 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीत मॅच्यूअर होणाऱ्या FD वर 3.00 टक्के व्याजदर देणार आहे.

बँक 46 ते 60 दिवसांत मॅच्यूअर होणाऱ्या ठेवींसाठी 3.25 टक्के आणि 61 ते 90 दिवसांत मॅच्यूअर होणाऱ्या ठेवींसाठी 3.40 टक्के व्याज दर देणार आहे. 91 दिवस ते 6 महिन्यांत मॅच्यूअर होणाऱ्या FD वर आता 4.00 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे.

अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, एसबीआय, पीएनबी यांनीही त्यांचे एफडी वरील दर वाढवले ​​आहेत. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर सर्व बॅंकांची दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com