UPI users alert Dainik Gomantak
अर्थविश्व

UPI Transactions: 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर द्यावा लागणार GST? सरकारने सांगितली सत्यता

GST On UPI Transactions: केंद्र सरकार 2000 पेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर GST लागू करणार असल्याचे दावे सोशल मीडियावर करण्यात आले. मात्र आता सोशल मीडियावरील या दाव्यासंबंधी खुद्द सरकारनेच स्पष्टीकरण दिले आहे.

Manish Jadhav

केंद्र सरकार 2000 पेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर GST लागू करणार असल्याचे दावे सोशल मीडियावर करण्यात आले. मात्र आता सोशल मीडियावरील या दाव्यासंबंधी खुद्द सरकारनेच स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. सरकारकडून सांगण्यात आले की, सोशल मीडियावर करण्यात येत असलेले दावे पूर्णपणे खोटे, निराधार आणि दिशाभूल करणारे आहेत. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी (18 एप्रिल) सांगितले की, सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव नाही.

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जीएसटी फक्त त्या शुल्कांवर आकारला जातो जे पेमेंट गेटवे किंवा इतर मार्गांनी आकारल्या जाणाऱ्या सेवा शुल्काशी (जसे की मर्चंट डिस्काउंट रेट - एमडीआर) संबंधित आहेत. तथापि, जानेवारी 2020 पासून, CBDT ने P2M (व्यक्ती ते व्यापारी) UPI व्यवहारांवरील MDR काढून टाकला आहे, याचा अर्थ UPI पेमेंटवर कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जात नाही, त्यामुळे GST आकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

सरकार UPI ला प्रोत्साहन देते

अर्थ मंत्रालयाने पुढे सांगितले की, सरकारचे उद्दिष्ट डिजिटल पेमेंट आणि विशेषतः UPI ला प्रोत्साहन देणे आहे. याअंतर्गत आर्थिक वर्ष 2021-22 पासून UPI ​​प्रोत्साहन योजना लागू करण्यात आली, जी विशेषतः कमी रकमेच्या P2M व्यवहारांना प्रोत्साहन देते.

या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत दिलेले प्रोत्साहन:

आर्थिक वर्ष 2021-22: ₹1,389 कोटी

आर्थिक वर्ष 2022-23: 2210 कोटी

आर्थिक वर्ष 2023-24: ₹3,631 कोटी

या आकडेवारीवरुन असे दिसून येते की, सरकार लहान व्यापाऱ्यांना आणि सामान्य ग्राहकांना डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सातत्याने गुंतवणूक करत आहे.

भारत डिजिटल पेमेंटमध्ये आघाडीवर

एसीआय वर्ल्डवाइड रिपोर्ट 2024 नुसार, 2023 मध्ये जगातील एकूण रिअल-टाइम व्यवहारांपैकी 49 टक्के व्यवहार भारतात (India) झाले. यावरुन सिद्ध होते की, भारत डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. UPI व्यवहारांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये ₹21.3 लाख कोटींवरुन मार्च 2025 पर्यंत ₹260.56 लाख कोटींवर पोहोचले आहे. यापैकी, P2M व्यवहार ₹59.3 लाख कोटींवर पोहोचले आहेत, जे व्यापारी आणि ग्राहक दोघांमध्ये डिजिटल पेमेंटवरील वाढता विश्वास दर्शवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT