Nitin Gadkari  Dainik Gomantak
अर्थविश्व

Nitin Gadkari: नितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी, हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांना...!

Nitin Gadkari News: तुम्हीही हायवेवरुन प्रवास करत असाल तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी अपडेट दिली आहे.

Manish Jadhav

Nitin Gadkari News: हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही हायवेवरुन प्रवास करत असाल तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी अपडेट दिली आहे.

गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले की, दिल्ली-डेहराडून एक्स्प्रेस वेचे बांधकाम या वर्षी डिसेंबरअखेर पूर्ण होईल. या एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

एक्सप्रेस वे 212 किमी लांबीचा असेल

गडकरी म्हणाले की, एक्सप्रेस वे 212 किमी लांबीचा असून त्याच्या बांधकामासाठी 12,000 कोटी रुपये खर्च आला आहे. गडकरी पुढे म्हणाले की, सहा पदरी दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवेचे 60-70 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.

दिल्लीहून 90 मिनिटांत हरिद्वारला पोहोचणार

पाचव्या अयोध्या महोत्सवाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, दिल्ली-डेहराडून एक्स्प्रेस वेचे बांधकाम या वर्षीच्या डिसेंबरअखेर पूर्ण होईल, त्यानंतर प्रवाशांना अवघ्या दोन तासांत दिल्लीहून डेहराडून आणि दिल्लीहून (Delhi) हरिद्वारला अवघ्या दोन तासांत पोहोचता येईल.

एका अधिकृत निवेदनानुसार, एक्सप्रेसवे चार खंडामध्ये विभागला गेला आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून दिल्लीतील अक्षरधामजवळ शास्त्री पार्क, खजुरी खास, बागपत, शामली, सहारनपूर ते उत्तराखंडमधील (Uttarakhand) डेहराडून मार्गे बांधला जाईल.

निवेदन जारी केले

निवेदनानुसार, संपूर्ण एक्स्प्रेस वेच्या बांधकामात अनेक विशेष तरतुदी करण्यात आल्या असून गणेशपूर ते डेहराडून हा मार्ग वन्यजीवांसाठी सुरक्षित करण्यात आला आहे. निवेदनानुसार, 12 किलोमीटर उन्नत रस्ता, सहा पशु अंडरपास, दोन हत्ती अंडरपास, दोन मोठे पूल आणि 13 लहान पुलांची तरतूद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT