Nitin Gadkari Dainik Gomantak
अर्थविश्व

Nitin Gadkari: नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा, दुचाकीस्वारांचे बल्ले-बल्ले!

Nitin Gadkari on Electric Vehical: हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल (FFV-SHEV) ची पहिली पायलट योजना सुरु केली आहे.

दैनिक गोमन्तक

Nitin Gadkari on Electric Vehical: येत्या एक वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल कारच्या किमतीएवढी असेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ही बातमी कार आणि दुचाकीस्वारांना दिलासा देणारी आहे. दरम्यान, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जपानी कार निर्माता टोयोटाच्या फ्लेक्स फ्युएल-स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल (FFV-SHEV) ची पहिली पायलट योजना सुरु केली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, 'तंत्रज्ञान आणि हरित इंधनात झपाट्याने होणारी प्रगती, यामुळे इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल्सच्या किमती कमी होतील.' म्हणजेच याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. पुढील एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या किमतीएवढीच असेल. त्यामुळे आगामी काळात क्रांती होऊ शकते, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.

प्रदूषणाची पातळी कमी होईल

याशिवाय, नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2022-23 च्या अनुदानाच्या मागण्यांवर लोकसभेत उत्तर देताना सांगितले होते की, 'स्वदेशी इंधनाकडे जाण्याची गरज आहे, लवकरच इलेक्ट्रिक इंधन बनणार आहे. त्यामुळे प्रदूषणाची पातळी कमी होईल. प्रदूषण हे केवळ भारतासमोरच (India) नाही तर जगासमोरील मोठे आव्हान आहे.'

अशी मागणी केंद्रीय मंत्र्यांनी केली

यासोबतच केंद्रीय मंत्री गडकरी यांनी खासदारांना हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहनही केले. खासदारांनी आपापल्या भागातील सांडपाण्याचे पाणी ग्रीन हायड्रोजनमध्ये बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. लवकरच हायड्रोजन हा सर्वात स्वस्त इंधन पर्याय असेल, असेही त्यांनी सांगितले.

शेवटी गडकरी म्हणाले की, 'लिथियम आयन बॅटरीच्या किमती झपाट्याने कमी होत आहेत. आम्ही झिंक-आयन, अ‍ॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरी विकसित करत आहोत. जास्तीत जास्त दोन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटो रिक्षाची किंमत पेट्रोलवर चालणारी स्कूटर, कार, ऑटोरिक्षाच्या बरोबरीत असेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT