Electric Highway  Dainik Gomantak
अर्थविश्व

नितीन गडकरींचा नवा प्लान, दिल्ली-मुंबई दरम्यान बनणार इलेक्ट्रिक हायवे

तुमचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार युध्दपातळीवर काम करत आहे.

दैनिक गोमन्तक

Electric Highway: तुमचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार युध्दपातळीवर काम करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एकीकडे 6 एअरबॅग्ज आणि इंडिया एनसीएपी क्रॅश चाचणीसारख्या नियमांना हिरवा कंदिल दिला आहे.

दुसरीकडे, देशभरात अत्याधुनिक महामार्ग बांधले जात आहेत. यातच आता सरकारने या दिशेने नवे पाऊल उचलले आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हायड्रोलिक ट्रेलर ओनर्स असोसिएशनच्या एका कार्यक्रमात सांगितले की, 'सरकार दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) दरम्यान इलेक्ट्रिक हायवे बनवण्याचा विचार करत आहे.' या महामार्गावर ट्रॉली बस आणि ट्रॉली ट्रकही धावू शकतात, असे ते म्हणाले.

ट्रॉलीबससह ट्रॉली ट्रकही धावतील

नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की, 'देशातील पहिला इलेक्ट्रिक हायवे दिल्ली ते जयपूर दरम्यान बनवला जाईल. हा 200 किमी लांबीचा महामार्ग दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गासह नवीन लेनवर बांधला जाईल. ही लेन पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल. यामध्ये फक्त इलेक्ट्रिक वाहने चालवली जातील. एकदा पूर्णपणे तयार झाल्यानंतर, हा देशातील पहिला इलेक्ट्रिक हायवे देखील बनेल. हा इलेक्ट्रिक हायवे स्वीडिश कंपन्यांच्या सहकार्याने विकसित केला जात आहे. या इलेक्ट्रिक हायवेवर ट्रॉलीबससह ट्रॉली ट्रकही धावणार आहेत. ट्रॉलीबस ही एक इलेक्ट्रिक बस आहे, जी ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरद्वारे चालविली जाते ज्याद्वारे ती प्रवास करते.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT