Nitin Gadkari
Nitin Gadkari  Dainik Gomantak
अर्थविश्व

Electric Vehicles Costing: कार चालकांसाठी आनंदाची बातमी, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा!

Manish Jadhav

Nitin Gadkari Plan Electric Vehicles Costing: गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षी 22 मे रोजी केंद्र सरकारने तेलावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती.

त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 8 रुपयांनी कमी झाले. या वर्षभरात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली असली तरी. सध्या क्रूड प्रति बॅरल $75 च्या आसपास आहे.

तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढली आहे. परंतु अनेक वेळा महागड्या खर्चामुळे आणि देखभालीमुळे त्यांना इलेक्ट्रिक कार घेणे शक्य होत नाही.

इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करण्याचे नियोजन

प्रदूषणाची (Pollution) वाढती पातळी आणि पेट्रोलची वाढती किंमत लक्षात घेता, सरकार आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन (EV) च्या किमती कमी करण्याच्या योजनेवर काम करत आहे.

अशा परिस्थितीत, आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) किमती पेट्रोल कारच्या बरोबरीने राहतील अशी अपेक्षा आहे.

सध्या पेट्रोल कारपेक्षा डिझेल आणि सीएनजी कार महागल्या आहेत. गेल्या काही दिवसांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात घोषणा केली होती.

इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल कारच्या बरोबरीने असेल

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गेल्या वर्षी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते की, 'तो दिवस दूर नाही जेव्हा इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल कारच्या बरोबरीने असेल.'

देशभरात इलेक्ट्रिक बसेस चालवण्याची सरकारची सविस्तर योजना असल्याचे गडकरी म्हणाले होते. सरकार या दिशेने वेगाने पुढे जात आहे. सध्या पेट्रोल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारची किंमत जास्त आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर कार चालवणारे लोक खूश आहेत.

तसेच, देशात येणारा काळ हा इलेक्ट्रिक मोबिलिटीचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विद्युत इंधन लवकरच प्रत्यक्षात येईल, अशी आशा केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केली.

एका अहवालानुसार, इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रत्येक श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत 800 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. एका आकडेवारीनुसार, सध्या दरवर्षी 25 ते 30 लाख इलेक्ट्रिक कारची नोंदणी होत आहे. देशात हायड्रोजन कारचे कामही वेगाने सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

Taliban: तेलाच्या खेळात तालिबान आजमावतोय हात; ‘या’ दोन देशांसोबत बनवली खास योजना!

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

SCROLL FOR NEXT