Nitin Gadkari  Dainik Gomantak
अर्थविश्व

Nitin Gadkari: कार चालवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ''गडकरींनी नवीन वर्षात..."

Nitin Gadkari Latest News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Nitin Gadkari Latest News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आता कार आणि बाईक चालवणाऱ्यांसाठी सरकारकडून मोठी योजना आखली जात आहे. नितीन गडकरी यांनी जाहीर केले की, 'फेब्रुवारीच्या अखेरीस बंगळूरु-म्हैसूर द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले जाईल. बंगळूरु-म्हैसूर एक्स्प्रेस वेवरुन दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ 90 मिनिटे असेल.' यावेळी किमान 3 तास लागतात.

4,473 कोटी रुपये खर्च होणार आहेत

पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले की, 'उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित केले जाईल. या एक्स्प्रेस वे मुळे म्हैसूर, श्रीरंगपटना येथील पर्यटनाचा विकास होईल. त्याचबरोबर आयटी उद्योगालाही चालना मिळेल.' 4,473 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 118 किलोमीटर लांबीच्या 10-लेन महामार्गाचीही त्यांनी पाहणी केली.

38 किमी अंतर कमी होईल

याशिवाय, बंगळूरु-चेन्नई एक्स्प्रेस वे चे उद्घाटन जानेवारी 2024 पर्यंत होणार आहे. चेन्नई (Chennai) आणि बंगळूरु ही देशातील सर्वात महत्त्वाची मेट्रो शहरे असल्याचे गडकरींनी म्हटले आहे. एक्सप्रेसवे हे अंतर 38 किमीने कमी करते. त्याचबरोबर प्रवासाचा वेळ पाच तासांवरुन 2.15 तासांवर आणतो. यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्चही चार ते सहा टक्क्यांनी कमी होईल.

डबल डेकर बस सुरु करण्याचीही योजना

ते पुढे म्हणाले की, 'कर्नाटक हे एक महत्त्वाचे राज्य असून बंगळूरुमधील वाहतूक कोंडी कमी करण्याचा आम्ही विचार करत आहोत. तसेच 200 लोकांची क्षमता असलेली डबल डेकर स्काय बस सुरु करण्याचा विचार केला जाणार आहे.' याबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशीही मी चर्चा केली असल्याचे गडकरींनी यावेळी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: मायक्रोसॉफ्ट नाही, 'झोहो शो'! केंद्रीय मंत्र्यांनी दिला स्वदेशी सॉफ्टवेअरला 'प्राइम टाइम' बूस्ट

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Viral Video: सीटवरुन 'महाभारत'! बसमध्ये दोन महिलांची तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'बायकांनी नवऱ्याचा राग...'

Senior T20 Cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

SCROLL FOR NEXT