निसान मोटर इंडियाने टीझर रिलीज करुन त्यांच्या 2 आगामी कारची झलक दाखवली, ज्यामध्ये एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि 7 सीटर एमपीव्हीचा समावेश आहे. कंपनीने मार्च 2025 मध्ये दोन्ही कारच्या लाँचिंगची माहिती पहिल्यांदा दिली होती. कंपनीने सांगितले की, नवीन एमपीव्ही 2025 मध्ये लॉन्च केली जाईल. दरम्यान, 5-सीटर सी-एसयूव्ही (कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल) 2026 च्या सुरुवातीला लॉन्च केली जाईल.
दरम्यान, निसानची आगामी एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, स्कोडा कुशाक आणि इतर कारशी स्पर्धा करेल. निसान मोटर इंडियाकडून सांगण्यात आले की, 2026 पर्यंत भारतीय ग्राहकांसाठी बी/सी आणि डी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये 4 कार लॉन्च करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, ही MPV रेनॉल्ट ट्रायबरशी स्पर्धा करेल. तथापि, निसानने दोन्ही कारमध्ये उपलब्ध असलेले इंजिन पर्याय आणि फीचर्सची माहिती उघड केलेली नाही.
निसानची ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही रेनॉल्ट डस्टरवर आधारित असेल. कंपनीने म्हटले आहे की, नवीन सी-एसयूव्ही निसान पेट्रोलसारखीच दिसेल, जी जागतिक बाजारपेठेत विकली जाणारी प्रीमियम एसयूव्ही आहे. सी-एसयूव्हीमध्ये त्या कंपनीचा एसयूव्ही डीएनए असेल आणि ती मजबूत विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानासह येईल अशी अपेक्षा आहे. लवकरच लॉन्च होणाऱ्या सी-एसयूव्हीला भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीनुसार ग्राउंड क्लिअरन्स जास्त असेल.
दुसरीकडे, निसान एमपीव्ही ही रेनॉल्ट ट्रायबरची मेकॅनिकल सिबलिंग असेल. ऑटोमेकरने घोषणा केली की, निसान बी-एमपीव्हीला निसानच्या स्वतःच्या डिझाइननुसार अधिक मजबूत स्टाईलिंग मिळेल. ती अशा प्रकारे डिझाइन केली आहे की, सर्व प्रवाशांना आराम देण्यासोबतच ड्रायव्हिंगला मजेदार बनवते.
निसान मोटर इंडियाचे एमडी सौरभ वत्स यांनी एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, दोन्ही वाहनांचे प्लॅटफॉर्म एकच असेल परंतु त्यांचे डिझाइन वेगळे असतील आणि दोन्ही वेगवेगळ्या सेगमेंटमधील ग्राहकांच्या (Customers) गरजा पूर्ण करतील. वत्स यांनी पुढे सांगितले की, सी-सेगमेंटची निसान एसयूव्ही, ज्याचा खर्च $600 दशलक्ष आहे, ती मॅग्नाइटसारखीच भारतात बनवलेली कार असेल, जी इतर देशांमध्ये देखील निर्यात केली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.