
Kia Seltos Hybrid to Launch in India Soon Rival to Creta & Grand Vitara
भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ग्रँड विटारा सारख्या लोकप्रिय एसयूव्हीशी स्पर्धा करणारी किआ सेल्टोस लवकरच अधिक मायलेजसह येणार आहे. किआ मोटर्स सेल्टोसच्या दुसऱ्या पिढीच्या मॉडेलवर काम करत आहे. कंपनीने अलीकडेच खुलासा केला की, ते किआ सेल्टोस हायब्रिड इंजिनसह लॉन्च करण्याची योजना आखत आहेत. कंपनीने सोलमध्ये झालेल्या गुंतवणूकदारांच्या बैठकीत खुलासा केला की, ते येत्या काही वर्षांत हायब्रिड आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह अनेक कार लॉन्च करतील. कंपनीचे भारतातील एकूण विक्रीत 25 टक्के हायब्रिड आणि 18 टक्के ईव्ही समाविष्ट करण्याचे लक्ष्य आहे.
किआ सेल्टोस 2019 मध्ये भारतात (India) लॉन्च करण्यात आली. लॉन्च झाल्यापासून, किआ सेल्टोस फार कमी वेळात ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ग्रँड विटारा सारख्या एसयूव्हीइतकीच लोकप्रिय झाली. याचे कारण कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटची जास्त मागणी ठरली. किआने 2023 मध्ये अधिक फिचर्स आणि शक्तिशाली इंजिनसह एसयूव्ही अपडेट केली.
अहवालानुसार, किआ सध्याच्या मॉडेलच्या 1.5-लिटर एनए पेट्रोल इंजिनसह हायब्रिडची जोडणी करेल. सध्याच्या 1.5-लिटर एनए पेट्रोल इंजिनपेक्षा ते जास्त पॉवर देण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. हायब्रिड तंत्रज्ञानामुळे (Technology) एसयूव्हीचे मायलेज सुधारण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. या मजबूत हायब्रिड मॉडेलला 20-25 किमी प्रति लिटरपेक्षा जास्त मायलेज मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या, ह्युंदाई क्रेटा पेट्रोल मॉडेल 16-18 किमी प्रति लिटर मायलेज देते आणि मारुती ग्रँड विटारा हायब्रिड 27.97 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते.
नवीन किआ सेल्टोसमध्ये पूर्वीसारखेच 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे, तथापि, ते माइल्ड हायब्रिड असू शकते. परंतु एमिशन नॉर्म्समुळे, कंपनी कदाचित 1.5-लिटर डिझेल मॉडेल बंद करु शकते. एवढेच नाहीतर किआ भारतासाठी सेल्टोस सारखी 6-7 सीटर एसयूव्ही देखील तयार करत आहे. यामध्येही पेट्रोल हायब्रिड पॉवरट्रेन प्रदान केले जाऊ शकते अशी अपेक्षा आहे. अहवालानुसार, नवीन पिढीच्या किआ सेल्टोसच्या डिझाइनमध्ये काही बदल होऊ शकतात. यात नवीन एलईडी हेडलॅम्प, नवीन ओआरव्हीएम आणि ड्युअल-टोन अलॉय व्हील्स असू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.