FM Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax भरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने जारी केली गाइडलाइन; भरावा लागणार 'टॅक्स'

FM Nirmala Sitharaman: निर्मला सीतारामन यांनी माहिती देताना सांगितले की, आता तुमच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही.

Manish Jadhav

Income Tax Latest News: आयकर भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती देताना सांगितले की, आता तुमच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही.

केंद्र सरकारकडून अशा अनेक सुविधा दिल्या जात आहेत, ज्याचा फायदा घेऊन तुम्हाला त्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

उत्पन्नावर कर आकारला जाणार नाही

दरम्यान, 2.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे, परंतु याशिवाय, असे अनेक उत्पन्न आहे, ज्यावर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागत नाही. तुमचे कोणते उत्पन्न (Income) करमुक्त आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ग्रॅच्युइटीवर कर आकारला जात नाही

नोकरी करणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही संस्थेत 5 वर्षानंतर आपली कंपनी सोडल्यास त्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. ही रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. जर सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल (Employees) बोलायचे झाल्यास, त्यांची 20 लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त आहे. त्याचबरोबर, खासगी कर्मचाऱ्यांची 10 लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त आहे.

PPF आणि EPS वर कर आकारला जाणार नाही

याशिवाय, पीपीएफच्या पैशांवरही कर नाही. यावर मिळणारे व्याज, मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम, तिन्ही करमुक्त आहे. यासोबतच, जर कर्मचाऱ्याने 5 वर्षे सलग काम केल्यानंतर त्याचा EPF काढला तर त्याला या रकमेवरही कर भरावा लागणार नाही.

अशा भेटवस्तूंवर कोणताही कर भरावा लागणार नाही.

त्याचबरोबर, जर तुम्हाला तुमच्या पालकांकडून कौटुंबिक मालमत्ता, रोख रक्कम किंवा दागिने मिळाले असतील तर ते करमुक्त आहे. अशा भेटवस्तूंवर कोणताही कर आकारला जात नाही. जर त्याला त्याच्या पालकांकडून मिळालेली रक्कम गुंतवून कमवायचे असेल, तर त्याला त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT