Nirmala Sitharaman chairs 46th GST Council meeting in Delhi

 

Dainik Gomantak

अर्थविश्व

कपडे आणि फुटवेअरचे दर वाढवण्यासंदर्भात GST परिषदेचा मोठा निर्णय

अनेक राज्ये आणि वस्त्रोद्योग संघटना हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत होते.

दैनिक गोमन्तक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने कपड्यांवरील जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय आज मागे घेतला. जीएसटी काउंसिल यापूर्वी कपड्यांवरील जीएसटी (GST) दर 5 टक्क्यांवरून 7 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक राज्ये आणि वस्त्रोद्योग (Textile industry) संघटना हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत होते.

वस्त्रोद्योग क्षेत्रावरील वाढीव जीएसटी पुढे ढकलण्याबाबत चर्चा

जीएसटी परिषदेने 1 जानेवारी 2022 पासून कापड उत्पादनांवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु राज्य सरकारे आणि वस्त्रोद्योग जीएसटी दर वाढविण्यास विरोध करत होते. त्यामुळे जीएसटी काउंसिलच्या आजच्या बैठकीत कपड्यांवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला.

अर्थ मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली आहे की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज दुपारी 3 वाजता (तात्पुरती वेळ) पत्रकार परिषद घेणार आहेत आणि जीएसटी परिषदेच्या निर्णयांची माहिती देणार आहेत. याबाबत पीआयबीचे ट्विट अर्थ मंत्रालयाकडून रिट्विट करण्यात आले आहे.

दिल्लीसह अनेक राज्यांनी विरोध केला होता

17 सप्टेंबर रोजी झालेल्या परिषदेच्या शेवटच्या बैठकीत पादत्राणे आणि कपड्यांवरील जीएसटी दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, हा निर्णय सर्वसामान्यांसाठी अनुकूल नसून तो मागे घ्यावा. तामिळनाडूचे अर्थमंत्री पी त्यागराजन म्हणाले की, जीएसटी काउंसिलच्या बैठकीच्या या एकाच अजेंड्याला अनेक राज्यांचा पाठिंबा आहे आणि हे पाऊल थांबवायला हवे.

सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत

सध्या जीएसटी दरांचे चार स्लॅब आहेत. 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के. जीएसटीचे 12 टक्के आणि 18 टक्के स्लॅब एकत्र करून एक स्लॅब बनवण्याची मागणी आहे. त्याचवेळी, राज्यांचे अर्थमंत्री कपड्यावरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास विरोध करत होते, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Casino: गोव्यातील कॅसिनोंमध्ये 21 वर्षांखालील तरुणांना प्रवेशबंदी; कडक परवाना आणि 18% व्याजाची दंडात्मक कारवाई

पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! हणजूण, वागातोर आणि म्हापशात 'FDA'ची धडक मोहीम; अस्वच्छता आढळल्याने तीन दुकाने तात्काळ सील

Goa Bench: जन्मठेपेवरून थेट निर्दोष मुक्तता; मडगावातील दुहेरी खून प्रकरणी, सत्र न्यायालयाचा निकाल गोवा खंडपीठाने बदलला

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT