Share Market Dainik Gomantak
अर्थविश्व

Share Market: अबब! टेबल-खुर्ची बनवणाऱ्या कंपनीकडून शेअर होल्डर्सना 200 टक्के डिव्हिडंड

Share Market: नीलकमल ही आशियातील सर्वात मोठी प्लास्टिक मॉड्यूलर उत्पादन निर्मिती कंपनी आहे. ही जगातील सर्वात मोठी मॉड्युलर फर्निचर बनवणारी कंपनी आहे.

Manish Jadhav

Nilkamal : प्लॅस्टिक टेबल-खुर्ची निर्माता कंपनी नीलकमलने अर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. भागधारकांना 200 टक्के बंपर डिव्हिडंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नीलकमल ही आशियातील सर्वात मोठी प्लास्टिक मॉड्यूलर उत्पादन निर्मिती कंपनी आहे. ही जगातील सर्वात मोठी मॉड्युलर फर्निचर बनवणारी कंपनी आहे. चौथ्या तिमाहीत या स्मॉलकॅप कंपनीच्या नफ्यात जवळपास अडीच पटीने वाढ झाली आहे.

BSE वर उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने रु. 10 च्या दर्शनी मूल्याच्या आधारावर 200 टक्के म्हणजेच रु. 20 प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केला आहे.

एजीएमची बैठक 7 जुलै 2023 रोजी होणार आहे. रेकॉर्ड डेट (नीलकमल डिव्हिडंड रेकॉर्ड डेट) ३० जून ठेवण्यात आली आहे. लाभांश 17 जुलै रोजी किंवा नंतर दिला जाईल. FY2023 मध्ये, कंपनीने यापूर्वी जुलै 2022 मध्ये प्रति शेअर 15 रुपये लाभांश जाहीर केला होता.

निलकमलचा Q4 निकाल

चौथ्या तिमाहीच्या निकालांबद्दल बोलायचे झाल्यास, एकत्रित आधारावर एकूण उत्पन्न 832.41 कोटी रुपये होते. त्यात 11 टक्क्यांहून अधिक उसळी नोंदवली. निव्वळ नफा 48.23 कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वी ते 19.93 कोटी रुपये होते.

FY2023 मधील एकूण कामगिरी

FY2023 च्या एकूण कामगिरीबद्दल बोलायचे तर एकूण उत्पन्न 3141.9 कोटी रुपये होते. निव्वळ नफा 133.99 कोटी रुपये होता. गेल्या आठवड्यात हा शेअर 2134 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप 3185 कोटी रुपये आहे.

निलकमलच्या एका शेअरची किंमत 2134

बॉंम्बे स्टॉक एक्सचेंजवर सध्या निलकमलच्या एका शेअरची किंमत 2134 इतकी आहे. या शेअरने ऑल टाइम हाय 3184 इतका लावला होता.

तर याची 2005 मध्ये 21 रुपयापर्यंत घसरणा झाली होती. मात्र त्यानंतर या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत असून, गुंतवणुकदारांना (Investors) सातत्याने मोठा मोबदला मिळत आहे. यामुळेच निलकमच्या शेअरला गुंतवणुकदारांची मोठी पसंती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT