Marriage Dainik Gomantak
अर्थविश्व

Government Scheme: 'या' योजनेंतर्गत नवविवाहित जोडप्यांना सरकार देतेय लाखो रुपये! लगेच करा अर्ज

Inter Caste Marriage: दरवर्षी दिवाळीच्या काही दिवसांनी लग्नसराई सुरु होते. या वर्षीही अनेक कुटुंबात मुला-मुलींची लग्ने झाली असतील.

दैनिक गोमन्तक

Inter Caste Marriage: दरवर्षी दिवाळीच्या काही दिवसांनी लग्नसराई सुरु होते. या वर्षीही अनेक कुटुंबात मुला-मुलींची लग्ने झाली असतील. अशा परिस्थितीत सरकारच्या योजनेची माहिती घ्यावी. आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेबद्दल सांगत आहोत, ज्याअंतर्गत सरकार नवविवाहित जोडप्यांना 2 लाख 50 हजार रुपये देतेय. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या भागातील खासदार किंवा आमदार यांच्याकडे अर्ज करावा लागेल. तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता ते जाणून घ्या...

या योजनेसाठी अर्ज करा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील विद्यमान आमदार किंवा खासदार यांच्याकडे जावे लागेल. तुम्ही दिलेला अर्ज ते डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या कार्यालयात पाठवतील. तुम्ही या योजनेसाठी राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन कार्यालयातही अर्ज करु शकता. लक्षात ठेवा अर्ज पूर्ण भरा आणि नियमानुसार कार्यालयात जमा करा. तेथून तुमचा अर्ज डॉ. आंबेडकर फाउंडेशनकडे पाठवला जाईल.

या योजनेअंतर्गत कोण अर्ज करु शकतो?

या योजनेंतर्गत, सामान्य प्रवर्गातील लोकांचेच अर्ज स्वीकारले जातात आणि त्यांनी दलित समाजातील मुलीशी विवाह केला, म्हणजेच लग्न करायचा मुलगा आणि लग्न करणारी मुलगी एकाच जातीची नसावी. तुमचा विवाह हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत नोंदणीकृत असावा. हे लक्षात ठेवा, हे तुमचे पहिले लग्न असावे. जर तुमचे हे दुसरे लग्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत तुम्ही केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे का, हेही लक्षात ठेवले जाते. जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल तर ती रक्कम कमी केली जाते. समजा तुम्हाला दुसऱ्या योजनेंतर्गत 50 हजार रुपये मिळाले असतील, तर ते जातील, म्हणजेच जर तुम्हाला दुसऱ्या योजनेत 10 हजार रुपये मिळाले असतील, तर सरकार 10 हजार रुपये कापून तुम्हाला 2 लाख 40 हजार रुपये देईल.

अर्ज कसा करायचा?

  • या अर्जासोबत नवविवाहित जोडप्यांना त्यांचे जात प्रमाणपत्र जोडावे लागेल.

  • अर्जासोबत विवाह प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

  • आपण विवाहित असल्याचे प्रतिज्ञापत्र देखील द्यावे लागेल.

  • हे लग्न तुमचे पहिले लग्न आहे, हे देखील तुम्ही सिद्ध केले पाहिजे.

  • पती पत्नीला उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

  • संयुक्त बँक खाते जमा केले जाईल, ज्यामध्ये तुम्हाला पैसे हस्तांतरित केले जातील.

तसेच, अर्ज सादर केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते आणि काही दिवसांनी त्यांच्या वतीने पती-पत्नीच्या बँक खात्यात दीड लाख रुपये ट्रान्सफर केले जातात, उर्वरित 1 लाख रुपये तुम्हाला एफडी म्हणून दिले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT