new Generation model Alto 800 Dainik Gomantak
अर्थविश्व

New Maruti Suzuki Alto 2022 : मारुती सुझुकी अल्टो 800चे न्यू जनरेशन मॉडेल लॉन्च

अल्टो 800 देशातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या मॉडेलपैकी एक कार

गोमन्तक डिजिटल टीम

मारुती सुझुकी देशातली सर्वात मोठी व आघाडीची वाहन निर्माता कंपनी आहे. मारुती सुझुकीने बनवलेल्या ४५ टक्के वाहने सध्या देशात वापरली जात आहेत. मारुती उद्योग लिमिटेड ह्या नावाने १९८१ साली ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. मारुती सुझुकीने अल्टो 800 वर्ष 2000 मध्ये पहिल्यांदा लॉन्च केली होती. देशातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या मॉडेलपैकी एक ही कार आहे. प्रथमच कार खरेदी करणाऱ्यांची पहिली पसंती बर्‍याच काळापासून या कारला आहे.

new Generation model Alto 800

मारुती सुझुकीने अल्टो 800 (Alto800) कारचे न्यू जनरेशन मॉडेल नव्या दमात लॉन्च केलं आहे. त्याची किंमत, फिचर्स आणि लुक बघता भारतातील अन्य कंपन्यांच्या वाहनांना Alto 800चे नवीन वेरिअंट तगडी टक्कर देईल. गेल्या काही वर्षांत अल्टोच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे कंपनी लवकरच देशात न्यू जनरेशन मॉडेल मारुति ऑल्टो 2022 लॉन्च करेल. ऑल्टोचे नवीन मॉडेल सेलेरियो हॅचबॅकमधील स्टाइलिंग घटक सामायिक करतात. या कारमध्ये 800cc, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे.

नवीन मारुती अल्टो 2022 पूर्णपणे नवीन एक्सटीरियर सोबत येते. यात मोठे स्वीप्टबॅक हेडलॅम्प, नवीन बंपर आणि टेललाइट्स मिळतील. समोरच्या बाजूस नवीन Celerio प्रमाणे डिझाइनसह एक नवीन आणि मोठी ग्रिल मिळेल. हॅचबॅक पूर्वीपेक्षा लांब आहे आणि बॉक्सियर साइड प्रोफाइल आहे. नवीन मॉडेलला फ्लॅट रूफलाइन आणि आकर्षक फेंडर्स मिळतात.

नवीन मारुती अल्टोचा आकार पूर्वीपेक्षा मोठा आहे, त्यामुळे केबिनमध्ये जागा अधिक उपलब्ध होईल. नवीन अल्टोच्या केबिनमध्येही एक्सटीरियरप्रमाणेच मोठे बदल होणार आहेत. कारमध्ये पूर्णपणे नवीन डॅशबोर्ड आणि सेंट्रल कन्सोल डिझाइन मिळेल. हॅचबॅकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, कीलेस एंट्री, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आणि इतर वैशिष्ट्यांसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळण्याची शक्यता आहे.

800cc, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन अल्टो 800 कारच्या न्यू जनरेशन मॉडेलमध्ये मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये सीएनजीवर चालणारे मॉडेलही उपलब्ध असेल. नवीन मॉडेलची किंमत ही जुन्या मॉडेलच्या तुलनेत जास्त असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 14 September 2025: आर्थिक लाभाचे संकेत, कुटुंबात सौख्य; भावनिक तणाव टाळा

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

SCROLL FOR NEXT