netflix loses subscribers Dainik Gomantak
अर्थविश्व

... म्हणून नेटफ्लिक्सचे सब्सक्रायबर्स घटले; कंपनीला मोठा झटका

100 दिवसांमध्ये नेटफ्लिक्सचे दोन लाखपेक्षा अधिक सब्सक्रायबर्समध्ये घट झाली आहे.

दैनिक गोमन्तक

सध्याच्या डिजिटल युगामध्ये चित्रपट, वेब सीरिज, डॉक्यूमेंट्री पाहण्यासाठी तरुण पिढी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मचा वापर करतात. पण नेटफ्लिक्स या कंपनीचे तीन महिन्यामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेटफ्लिक्सचे लाखो सब्सक्रायबर्स कमी झाले आहेत. जवळपास 100 दिवसांमध्ये नेटफ्लिक्सचे दोन लाखपेक्षा अधिक सब्सक्रायबर्स कमी झाले आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तीन महिन्यांमध्ये नेटफ्लिक्स युझरची संख्या 221.6 मिलियन झाली आहे. (Netflix loses subscribers News)

* सब्सक्रायबर्स घटण्याचे कारण....
नेटफ्लिक्स (Netflix) कंपनीनने दावा केला आहे की, रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सब्सक्रायबर्स कमी झाले आहेत. रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सनं रशियामध्ये त्यांची सेवा बंद केली आहे. तसेच कोरोनामुळे (Corona) अनेक लोक वर्क-फ्रॉम होम करत आहेत. यामुळे 2020 मध्ये कंपनीचा ग्रोथ रेट वाढला होता. पण अनेक लोक त्यांच्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना सोडून इतर व्यक्तींना देखील त्यांच्या नेटफ्लिक्सच्या अकाऊंटचे डिटेल्स देत होते. त्यामुळे देखील नेटफ्लिक्सचे नुकसान झाले आहे असे कंपनीनं सांगितले आहे.

नेटफ्लिक्सचे दोन लाख सब्सक्रायबर्स कमी झाल्याने कंपनीच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीने सांगितले की, सुमारे 222 मिलियन कुटुंब हे नेटफ्लिक्सचा वापर करत आहेत. पण नेटफ्लिक्स खात्यांची संख्या 100 मिलियन आहे. स्वस्त इंटरनेट डेटा असल्यानं स्मार्ट टीव्हीवर देखील लोक नेटफ्लिक्स वापरत आहेत. परंतु टेलिव्हिजन स्ट्रीमिंग सेवेचे ते पैसे देत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT