Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Net Direct Tax Collection: करदात्यांनी अर्थमंत्र्यांना दिली खूशखबर, अर्थ मंत्रालयाने जारी केली मोठी अपडेट

Advance Tax Payment: सरकारकडून करदात्यांना अग्रिम कर भरण्यासाठी (Advance Tax Payment) सातत्याने जागरुक केले जात आहे.

Manish Jadhav

Advance Tax Payment: सरकारकडून करदात्यांना अग्रिम कर भरण्यासाठी (Advance Tax Payment) सातत्याने जागरुक केले जात आहे. त्याचा परिणामही दिसू लागला आहे.

होय, चालू आर्थिक वर्षात 17 जूनपर्यंत देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 11.18 टक्क्यांनी वाढून 3.80 लाख कोटी रुपये झाले आहे. ही वाढ अॅडव्हान्स टॅक्स पेमेंटमुळे झाली आहे.

याबाबतची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या कार्यकाळात करदात्यांनी दिलेली ही आणखी एक आनंदाची बातमी आहे.

पहिल्या वर्षीही विक्रमी आयकर जमा झाला

यापूर्वी, 2021-22 या आर्थिक वर्षात ज्यांनी आयकर भरला होता, त्यांनी विक्रमी कर जमा केला होता. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत 17 जूनपर्यंत अग्रिम कर संकलन 1,16,776 लाख कोटी रुपये होते.

गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 13.70 टक्के अधिक आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 17 जूनपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 3,79,760 कोटी रुपये होते, ज्यात कॉर्पोरेट कर (CIT) च्या 1,56,949 कोटी रुपयांचा समावेश आहे.

2,22,196 कोटी पर्सनलस टॅक्स

सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) सह पर्सनल टॅक्स म्हणून 2,22,196 कोटी रुपये जमा झाले. ढोबळ आधारावर, परतावा समायोजित करण्यापूर्वी संकलन 4.19 लाख कोटी रुपये होते. ही रक्कम वार्षिक आधारावर 12.73 टक्के वाढ दर्शवते.

यामध्ये कॉर्पोरेट टॅक्समधील (Tax) 1.87 लाख कोटी रुपये आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्ससह पर्सनल टॅक्स 2.31 लाख कोटींचा समावेश आहे. 17 जूनपर्यंत परताव्याची रक्कम 39,578 कोटी रुपये होती, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 30 टक्क्यांनी अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT