NDTV Share Price Today Dainik Gomantak
अर्थविश्व

NDTV Share Price Today: एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये सलग पाचव्या दिवशी उसळी

अदानी समुहाने NDTV खरेदी केल्याच्या बातम्यांमुळे एनडीटीव्हीचे शेअर्स आज म्हणजेच गुरुवारीही उंच भरारी घेत आहेत.

दैनिक गोमन्तक

NDTV Share Price Today: अदानी समुहाने NDTV खरेदी केल्याच्या बातम्यांमुळे एनडीटीव्हीचे शेअर्स आज म्हणजेच गुरुवारीही उंच भरारी घेत आहेत. NSE वर, बुधवारच्या अप्पर सर्किटसह आज पुन्हा एकदा 388.20 च्या तुलनेत 5 टक्क्यांनी वाढून शेअर्स 407.60 रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या एका वर्षात NDTV च्या शेअरमध्ये 442 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून ते 254 टक्क्यांनी वाढले आहे. अधिग्रहणाची बातमी पहिल्यांदा समोर आल्यापासून कंपनीच्या शेअरची किंमत दुपटीने वाढली आहे. गेल्या 5 वर्षात कंपनीला 933 टक्के परतावा दिला आहे.

काल बुधवारी बाजार उघडताच NDTV च्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. एनडीटीव्हीचा शेअर बीएसईवर मंगळवारच्या बंद किमतीच्या तुलनेत 380 रुपयांवर उघडला. अल्पावधीतच तो पाच टक्क्यांनी वाढून 384.50 रुपयांवर पोहोचला. मंगळवारीही एनडीटीव्हीचे शेअर्स ट्रेंड करत होते. त्या दरम्यान, शेअर्स पाच टक्क्यांनी वाढून 366.20 रुपयांवर कालचा बाजार बंद झाला.

शेअर अधिग्रहणाची प्रक्रिया अशी झाली

अदानी समूहाने अलीकडेच स्वतःची मीडिया कंपनी AMG मीडिया नेटवर्क्स स्थापन केली आहे. NDTV चे शेअर्स विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड, त्याच AMG मीडिया नेटवर्क्सची उपकंपनी विकत घेणार आहेत. कंपनीने 12 वर्षांपूर्वी एनडीटीव्हीची प्रवर्तक कंपनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडला कर्ज दिले होते, ज्याच्या विरोधात शेअर्स विकत घेतले जात आहेत.

अदानी समूहाने असेही म्हटले आहे की, ते एनडीटीव्हीचे अतिरिक्त 26 टक्के शेअर्स खरेदी करण्यासाठी खुल्या ऑफरसह समोर येणार आहेत. जर अदानी समूह यात यशस्वी झाला, तर NDTV मधील त्यांची एकूण हिस्सेदारी 55.18 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि अदानी ग्रुप सर्वात मोठा भागधारक बनेल. सध्या, NDTV समूहाचे सर्वात मोठे भागधारक हे त्याचे संस्थापक प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय आहेत. एनडीटीव्हीमध्ये त्यांचे फक्त 32 टक्के शेअर्स शिल्लक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT