Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Navratri 2022: नवरात्रीमध्ये या 9 ठिकाणी करा गुंतवणूक, मिळेल छप्परफाड परतावा

Financial Planning: शारदीय नवरात्रीचे 9 पवित्र दिवस कोणत्याही कामासाठी शुभ मानले जातात.

दैनिक गोमन्तक

Navratri Investment Planning: शारदीय नवरात्रीचे 9 पवित्र दिवस कोणत्याही कामासाठी शुभ मानले जातात. या दिवसात तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळतील. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा 9 पर्यायांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्‍ही गुंतवणूक करुन कधीही पैसे गमावणार नाहीत. जर तुम्ही आता या पर्यायांमध्ये हुशारीने गुंतवणूक केली तर भविष्यात तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या भविष्यातील जबाबदाऱ्या सहज पार पाडू शकाल.

1. PPF खाते ओपन करा

पीपीएफ (PPF) म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा देखील गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक (Investment) करु शकता. यामध्ये 15 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवले जातात. त्यात पैसे ठेवल्यास, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत कर सूट देखील मिळते. यावर मिळणारे व्याजही करमुक्त असते.

2. शेअर बाजारात पैसे गुंतवा

शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणुकीचा ट्रेंड जरा नवीन आहे, परंतु त्यात गुंतवणूक करणे हा अतिशय शहाणपणाचा निर्णय आहे. जर तुम्ही जोखीम घेण्यास घाबरत नसाल तर तुम्ही शेअर मार्केटमधून नक्कीच पैसे कमवू शकता.

3. सुकन्या समृद्धी योजना चांगली योजना

जर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्ही तुमचे पैसे या योजनेत नक्कीच गुंतवावे. तुम्ही त्यात नियमितपणे गुंतवणूक सुरु करु शकता. यामध्ये गुंतवणुक केल्यास भविष्यात मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नाच्या खर्चासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील.

4. रिअल इस्टेट सर्वोत्तम गुंतवणूक!

रिअल इस्टेट हाही गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, प्रॉपर्टी खरेदी करणे हा कधीही तोट्याचा सौदा नसतो. मालमत्तेचे मूल्यही झपाट्याने वाढते. आपण इच्छित असल्यास, रिअल इस्टेट (Real Estate) स्टॉकमध्ये देखील पैसे गुंतवू शकता.

5. पोस्ट ऑफिस बचत योजना

भारत सरकार पोस्ट ऑफिसद्वारे अनेक लहान बचत योजना देखील ऑफर करते. यामध्ये तुम्ही बचत खाते, टाइम डिपॉझिट, किसान विकास पत्र, NSC यासह अनेक पर्यायांमध्ये गुंतवणूक करु शकता. अलीकडेच सरकारने यावरील व्याजदरातही वाढ केली आहे.

6. सोने चांगले परतावा देईल

भारतात सोने खरेदी हा नेहमीच सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. जर तुम्ही गुंतवणुकीची मानसिकता बनवत असाल तर तुम्ही सोन्यात गुंतवणूक केलीच पाहिजे.

7. जोखीम न घेता मुदत ठेवी करा

बँकांमधील मुदत ठेवी हा अत्यंत सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला निश्चित परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी मिळवणे सर्वात सुरक्षित मानले जाते.

8. पेन्शन योजनेत पैसे गुंतवा!

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली ही भारत सरकारची एक योजना आहे. ही एक पेन्शन योजना आहे. (निवृत्ती बचत योजना). NPS ही एक प्रकारची पेन्शन कम गुंतवणूक योजना आहे, जी बाजार आधारित परताव्याची हमी देते. भारतातील नागरिकांना वृद्धापकाळाची सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने याची सुरुवात केली आहे.

9. म्युच्युअल फंडातून कमाई

म्युच्युअल फंड (Mutual Funds) हा पैसा कमावण्याचा उत्तम पर्याय आहे. ज्याद्वारे तुम्ही नियमित गुंतवणूक करु शकता. यामध्ये शेअर बाजारातील थेट गुंतवणुकीपेक्षा जोखीम कमी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT