330 रुपयांच्या विमा योजनेवर मोठा निर्णय, 6 कोटींहून अधिक लोकांना थेट फायदा

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा (PMJJBY) 330 रुपयांचा प्रीमियम वाढवल्यानंतर आता सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा (PMJJBY) 330 रुपयांचा प्रीमियम वाढवल्यानंतर आता सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या 6 कोटींहून अधिक ग्राहकांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. (Irdai Eases Capital Requirement For PMJJBY To Encourage More Insurers To Participate In Detail)

काय आहे निर्णय: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत (PMJJBY) विमा कंपन्यांचा सहभाग वाढवण्यासाठी भांडवल आवश्यकतांशी संबंधित नियम शिथिल केले आहेत.

Money
'पीएम आवास योजने' अंतर्गत भारत सरकार देतय 20 लाख रुपये? व्हायरल मेसेजचे सत्य नेमके काय

ताज्या निर्णयानुसार, आता विमा कंपन्यांची भांडवल आवश्यकता 50 टक्के करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विमा कंपन्या जीवन ज्योती योजनेअंतर्गत अनेक नवीन पॉलिसी देऊ शकतील. ज्यामुळे मध्यमवर्गीयांना आर्थिक सुरक्षा मिळण्यास मदत होईल.

नियमांमध्ये बदल केल्यानंतर, जीवन ज्योती योजना ऑफर करणाऱ्या विमा कंपन्यांना कमी भांडवलाची आवश्यकता असेल. यामुळे विमा कंपन्यांना सरकारने (Government) ठरवून दिलेले लक्ष्य गाठणे सोपे होईल.

Money
PM Scheme 2022: 'या' योजने अंतर्गत महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन

प्रीमियम वाढला आहे: सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे प्रीमियम दर वाढवण्याची घोषणा केली आहे. आता जीवन ज्योती योजनेचा प्रीमियम दर 1.25 रुपये प्रतिदिन झाला आहे, ज्यामुळे त्याचा वार्षिक प्रीमियम 330 रुपयांवरुन 436 रुपये झाला आहे. 31 मार्च 2022 पर्यंत या योजनेअंतर्गत 6.4 कोटी लोकांनी नोंदणी केली होती.

Money
केंद्र सरकारच्या ‘नगरवन योजने’मुळे मिरामार किनाऱ्याची धूप थांबणार

रु. 2 लाख कव्हर: योजनेंतर्गत, 18-50 वयोगटातील विमाधारकास 2 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण दिले जाते. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत, या योजनेंतर्गत एकूण 9,737 कोटी रुपयांची प्रीमियम रक्कम जमा करण्यात आली आणि दाव्यांच्या विरोधात 14,144 कोटी रुपये भरले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com