Money
Money Dainik Gomantak
अर्थविश्व

NPS च्या नियमात पुन्हा मोठा बदल, पैसे जमा करण्यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक

दैनिक गोमन्तक

NPS Rule Changed: नॅशनल पेन्शन स्कीममध्ये तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारच्या या योजनेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी पीएफआरडीएने हे बदल केले आहेत.

दरम्यान, या बदलांतर्गत, ग्राहकांच्या (Customers) पैसे काढण्याच्या विनंतीवरुन T+4 ऐवजी T+2 दिवसांत केल्या जातील. इथे T म्हणजे शेअरहोल्डरने विनंती केलेला दिवस. म्हणजेच, विनंती केल्यानंतर दोन दिवस आणि म्हणजे एकूण 30 दिवस लागतील. यापूर्वी हे काम पाच दिवसांत होत असे.

दुसरीकडे, नव्या प्रणाली अंतर्गत, CRA शी संबंधित विनंत्या T+2 आधारावर सकाळी 10:30 पर्यंत निकाली काढल्या जातील. त्याच वेळी, Keffin Technologies Limited आणि CAMS CRA च्या भागधारकांकडून सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या विनंत्या T+2 च्या आधारावर निकाली काढल्या जातील. याआधीही एनपीएसशी संबंधित नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

तसेच, एनपीएसच्या ई-नामांकन प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. हा नवा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या अंतर्गत, नोडल अधिकारी ई-नामांकनासाठी अर्ज स्वीकारु किंवा नाकारु शकतो. नोडल ऑफिसरने अर्ज केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत ई-नामांकनावर निर्णय न घेतल्यास, केंद्रीय रेकॉर्ड कीपिंग सिस्टमद्वारे विनंती स्वीकारली जाईल.

यापूर्वी, NPS च्या सदस्यांना अंतिम मुदत पूर्ण झाल्यावर एक्झिट फॉर्म भरणे आवश्यक होते. यासोबतच आयुर्विमा कंपनीमध्ये अ‍ॅन्युइटी प्लॅन घेण्यासाठी फॉर्म भरणेही आवश्यक होते. परंतु आता अ‍ॅन्युइटी योजनेसाठी केवळ एक्झिट फॉर्मद्वारे अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आता फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही.

तसेच, NPS पेन्शनधारक आता डिजिटल जीवन प्रमाणपत्र देखील सादर करु शकतील. ते आधार पडताळणीवर अवलंबून असेल. हे काम FaceRD अ‍ॅपद्वारे केले जाऊ शकते, ज्यामध्ये मोबाइलमध्ये (Mobile) अ‍ॅप डाउनलोड करुन डिजिटल जीवन प्रमाणपत्र बनवता येते.

शिवाय, टियर-2 शहरातील खातेदार यापुढे क्रेडिट कार्डद्वारे (Credit Card) एनपीएस खात्यात पैसे जमा करु शकणार नाहीत. हा नियम गेल्या महिन्यातच लागू करण्यात आला आहे. तथापि, टियर-1 शहरातील खातेदार क्रेडिट कार्डद्वारे खात्यात पैसे जमा करु शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT