Narendra Singh Tomar Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Yojana: पीएम किसानच्या 14 हप्त्यापूर्वी कृषीमंत्र्यांची घोषणा, शेतकऱ्यांसाठी 'ही' विशेष मोहीम सुरु

PM Kisan Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजना सुरु केली आहे.

Manish Jadhav

PM Kisan Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजना सुरु केली आहे. या योजनेतर्गंत e-KYC वर भर दिला जात आहे. यापूर्वी ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना सरकारने योजनेचा हप्ता दिला नाही.

मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांचे ई-केआयसी पूर्ण झालेले नाही. यासाठी राज्य सरकारांच्या सहकार्याने विशेष मोहीमही राबवण्यात येत आहे.

'फेस ऑथेंटिकेशन'ची सुविधा सुरु केली.

आतापर्यंत फक्त OTP किंवा 'फिंगरप्रिंट' द्वारे ई-kyc करण्याची सुविधा उपलब्ध होती. पण आता चेहरा स्कॅन करुनही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

होय, ज्या शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे, ते आता OTP किंवा 'फिंगरप्रिंट' शिवाय त्यांचा चेहरा स्कॅन करुन ई-केवायसी पूर्ण करु शकतात. सरकारकडून यासाठी मोबाईल अॅप्लिकेशनवर 'फेस ऑथेंटिकेशन' सुविधा सुरु केली आहे.

13 वा हप्ता मिळाला

दरम्यान, ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु करण्यात आली होती. मात्र त्याची अंमलबजावणी डिसेंबर 2018 पासून करण्यात येत आहे. PM-KISAN चा 13वा हप्ता 8.1 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना अदा करण्यात आला आहे. आता शेतकरी (Farmer) पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेचा 14 वा हप्ता जून अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

दरवर्षी 6000 रुपयांचा आर्थिक लाभ

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम-किसान मोबाईल अॅपवर एक नवीन सुविधा सुरु केली. सरकारी निवेदनात म्हटले आहे की, पीएम-किसान मोबाईल अॅपद्वारे, दूरस्थ शेतकरी OTP किंवा फिंगरप्रिंट स्कॅनिंगशिवाय ई-केवायसी पूर्ण करु शकतात. दरमहा 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.

अॅपवरही ही सुविधा उपलब्ध असेल

पीएम किसान (PM Kisan) योजना अॅपवरील 'नो युजर स्टेटस मॉड्यूल' वापरुन, शेतकरी जमीन पेरणीची स्थिती, बँक खात्यांशी आधार लिंक करणे आणि ई-केवायसी स्थिती देखील जाणून घेऊ शकतात. कृषी मंत्रालयाने लाभार्थ्यांसाठी त्यांच्या दारात आधार लिंक बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये देखील मदत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT