Hanooman AI 
अर्थविश्व

ChatGPT ला टक्कर देण्यासाठी देशी Hanooman AI, 11 स्थानिक भाषांमध्ये सुरू होणार सेवा

Ashutosh Masgaunde

Mukesh Ambani's Reliance Industries and 8 IITs in the country will launch their first chat GPT style service from next month, called Hanooman AI:

भारताला लवकरच आपला देशी Chatgpt मिळणार आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज आणि देशातील 8 आयआयटी पुढील महिन्यापासून त्यांची पहिली चॅट जीपीटी स्टाईल सेवा सुरू करणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात भारताला पुढे नेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि देशातील आठ आयआयटी समर्थित भारत जीपीटी समूहाने नुकतेच मुंबईतील तंत्रज्ञान परिषदेत त्यांच्या मॉडेलची झलक दाखवली.

परिषदेत प्ले केलेल्या व्हिडिओमध्ये, दक्षिण भारतातील एक मोटरसायकल मेकॅनिक तामिळमध्ये बोलत आहे, एक बँकर हिंदीमध्ये आणि हैदराबादमधील एक विकसक संगणक कोड लिहिणासाठी एआय बॉटशी चर्चा केली.

हनुमान AI

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, या एआय मॉडेलचे नाव हनुमान आहे. जर ते यशस्वी झाले तर ते भारतातील AI तंत्रज्ञानाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल.

भारत जीपीटीचे हे मॉडेल हेल्थ केअर, गव्हर्नन्स, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि एज्युकेशन या चार मुख्य क्षेत्रात 11 स्थानिक भाषांमध्ये काम करेल.

हे मॉडेल आयआयटी मुंबईसह भारतीय तंत्रज्ञान संस्थांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. याला वायरलेस वाहक Reliance Jio Infocomm Limited आणि भारत सरकारचेही सहकार्य आहे.

व्यावसायिक आणि सामाजिक वापरात वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी “हनुमान” AI मॉडेलचे सुलभीकरण करण्यात आले आहे. त्याच्या सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे ते स्पीच टू टेक्स्ट क्षमतांना सपोर्ट करेल.

याव्यतिरिक्त, रिलायन्स जिओने सानुकूलित मॉडेल विकसित करण्याची घोषणा केली आहे जी वायरलेस वाहक रिलायन्स जिओसाठी उपलब्ध असेल.

भारतासाठी ओपन-सोर्स एआय मॉडेल्सवर काम करणाऱ्या अनेक स्टार्टअप्स आहेत. त्याला अनेक नामवंत गुंतवणूकदार आणि अब्जाधीशांचा पाठिंबा मिळत आहे. सर्वम आणि कृत्रिम हे त्यापैकी प्रमुख आहेत.

या भारतीय कंपन्या त्यांच्या परवडणाऱ्या मॉडेलद्वारे सिलिकॉन व्हॅलीमधून काम करणाऱ्या OpenAI ला कडवी टक्कर देण्याची तयारी करत आहेत.

रिलायन्स जिओने आधीच स्पष्ट केले आहे की, ते अनेक विशेष प्रकल्पांसाठी मोठ्या भाषेच्या मॉडेलवर काम करत आहे. कंपनी आधीच जिओ ब्रेनवर काम करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT