Mukesh Ambani & Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना टाकले मागे, जगातील टॉप टेन श्रीमंतांमध्ये समावेश...

फोर्ब्सची अब्जाधीशांची रियल टाईम यादी

Akshay Nirmale

Mukesh Ambani In Top 10 Richest of The World : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी गौतम अदानींना मागे टाकत 9 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. आणि या यादीत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी दहाव्या क्रमांकावर आहेत.

आठवडाभरापूर्वी आलेल्या हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गौतम अदानी यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीनुसार, सध्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांची संपत्ती 214 अब्ज डॉलर्स इतकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर ट्विटरचे नवे मालक एलन मस्क आहेत. SpaceX चे संस्थापक आणि टेस्ला कंपनीचे CEO मस्क यांची संपत्ती 178 अब्जांपेक्षा जास्त आहे.

तिसऱ्या क्रमांकावर अॅमेझॉन ईकॉमर्स संकेतस्थळाचे संस्थापक जेफ बेझोस आहेत. चौथ्या क्रमांकावर लॅरी एलिसन, पाचव्या क्रमांकावर बडे गुंतवणूकदार वॉरेन बफे, सहाव्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, सातव्या क्रमांकावर कार्लोस स्लिम हेलू आणि आठव्या क्रमांकावर लॅरी पेज आहेत.

त्यानंतर यादीत दोन भारतीय श्रीमंतांची नावे आहेत. या यादीत मुकेश अंबानी 84.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 9 व्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, 10 व्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी यांची संपत्ती 84.1 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगण्यात आले आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे केवळ अदानी समूहाचे शेअर्स खाली कोसळले नसून अदानी यांचा श्रीमंतांच्या यादीतील क्रमांकही घसरला आहे. ब्लूमबर्गच्या जगातील श्रीमंतांच्या टॉप 10 यादीतून अदानी बाहेर पडले आहेत.

25 जानेवारीपुर्वी अदानी या यादीत तिसऱ्या स्थानी होती. हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर त्यांची चौथ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसरण झाली. हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे अदानी समुहाचे स्टॉक्स कोसळले.

अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे दीड लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले. त्यामुळे मंगळवारीच अदानी यांचा क्रमांक आणखी घसरला होता. ते सातव्या क्रमांकावरून 11 व्या क्रमांकावर आले होते. आणि आता बुधवारी थोड्या फरकाने मुकेश अंबानी यांनी अदानी यांना मागे टाकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT