Motorola Edge S Pro launching Dainik Gomantak news
अर्थविश्व

Motorola Edge S Pro: स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी नवा पर्याय

Motorolaचा दावा आहे की, Edge S Pro हा सर्वात स्लीम फ्लॅगशिप फोन आहे.

दैनिक गोमन्तक

मोटोरोला Edge S Pro चीनमध्ये नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. हा एक अतिशय स्लीम आणि हलका स्मार्टफोन आहे. मोटोरोलाचा दावा आहे की, मोटोरोला Edge S Pro हा सर्वात स्लीम फ्लॅगशिप फोन आहे. मोटोरोला Edge S Proची जाडी 7.99 मिमी आहे. तर वजन 189 ग्रॅम आहे. हा फोन तीन कलर ऑप्शन आणि व्हेरिएबल स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. चीनमध्ये आज रात्री 9 वाजल्यापासून फोनची प्री-बुकिंग करता सुरु होणार आहे. तर फोनची विक्री 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. विशेष बाब ही आहे की, मोटोरोला Edge S स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झाला होता. स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरला सपोर्ट करणारा हा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन होता. मात्र, आता कंपनीने मोटोरोला Edge S Pro स्मार्टफोन लॉन्च केला आहे. (Motorola Edge s Pro a Slim Flagship phone is launched)

मोटोरोला Edge S Pro किंमत

§ 6 GB रॅम + 128 GB = $ 371 (27,500 रुपये)

§ 8 GB रॅम + 128 GB = $ 418 (30,988 रुपये)

§ 8GB रॅम + 256GB = $ 464 (34,695 रुपये)

§ 12GB रॅम + 256GB = $ 511 (37,888 रुपये)

मोटोरोला Edge S Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच 10-बिट OLED डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 576Hz आहे. हे ड्युअल पंच-होल एलसीडी पॅनेलसह येईल. फोन HDR10+ला सपोर्ट करेल. फोन स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटसह येतो. फोनमध्ये 12GB टर्बो LPDDR5 रॅम आणि 56GB टर्बो UFS 3.1 स्टोरेज आहे.

मोटोरोला Edge S Pro कॅमेरा

मोटोरोल एज एस प्रो स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर 108MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 8 MP लेन्स आणि 16 MP अल्ट्रावाइड अँगल लेन्स देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी 32 एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअप साठी फोन मध्ये 4520mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा फोन 30W टर्बोपावर फास्ट चार्जिंगच्या सुविधेसह सज्ज आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित MYUI 2.0 वर काम करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT