Motorola Edge 30 Pro Price and features in India Dainik Gomantak
अर्थविश्व

60 MP सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनची आज होणार विक्री, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Motorola Edge 30 Pro ची आज भारतात दुपारी 12 वाजल्यापासून पहिली विक्री होणार आहे.

दैनिक गोमन्तक

60 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह (60 megapixel selfie camera) येणार्‍या Motorola Edge 30 Pro ची आज भारतात पहिली विक्री होणार आहे. त्याची विक्री दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार. हा स्मार्टफोन गेल्या आठवड्यात लॉन्च करण्यात आला आहे. या मोबाईलच्या मुख्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 144Hz ( 144Hz Refresh Rate ) चा रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. तसेच, यात Snapdragon 8 Gen 1 चिपसेट मिळेल. यात 68W चा फास्ट चार्जर मिळेल. हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजसह बाजारात उपलब्ध होणार आहे. तसेच या मोबाइलचे दोन रंग सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहे. (Motorola Edge 30 Pro Price and features in India)

Motorola Edge 30 Pro ची किंमत 49,999 रुपये आहे, ज्यामध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज अॅड आहे. हा फोन कॉसमॉस ब्लू आणि स्टारडस्ट व्हाइट रंगात येतो. हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट आणि अनेक मोठ्या रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता. हा Motorola चा प्रीमियम फोन आहे.

Motorola Edge 30 Pro चे स्पेसिफिकेशन

Motorola Edge 30 Pro च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यात 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आहे. यामध्ये ओएलईडी डिस्प्ले सेट करण्यात आला आहे.त्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. हा फोन HDR 10 Plus ला सपोर्ट करतो. या मोबाईलला स्नॅपड्रॅगन 8 gen 1 देण्यात आले आहे. हा फोन 8 GB LPDDR5 रॅम सह बाजारात उपलब्ध आहे.

Motorola Edge 30 Pro चा कॅमेरा सेटअप

Motorola Edge 30 Pro च्या कॅमेरा फिचरबद्दल बोलायचे झाले तर बॅक पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप करण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेकंड कॅमेरा देखील 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड शूटर आहे. ज्यात 2 मेगापिक्सल्सचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 60-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये अनेक मोड्स देण्यात आले आहेत, ज्याद्वारे उत्तम फोटोग्राफी करता येते. त्यामुळे हा मोबाइल वापरणाऱ्या ग्राहकाला आनंद मिळू शकतो. (Latest tech news in Marathi)

Motorola Edge 30 Pro ची वैशिष्ट्ये

या फोनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात टाइप सी पोर्ट, ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि डॉल्बी एटमॉससाठी सपोर्ट दिला गेला आहे. या स्मार्टफोनला IP 52 रेट केले गेले आहे, जे वॉटर रेसिस्टेंट आणि डस्ट रेसिस्टेंस आहे. या फोनमध्ये 4800 mAh बॅटरी आहे, जी 68W फास्ट चार्जरसह येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT