येणाऱ्या काही दिवसांमध्ये विमान प्रवास (Air Travel) तुम्हाला महाग पडू शकतो. विमान कंपन्या विमान प्रवास महाग करू शकतात. कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपण्यांनी विमान इंधनाच्या (ATF) किंमती 3.2 टक्क्यानी वाढवल्या आहेत, त्यानंतर देशातील एटीएफच्या किमती उच्चांक गाठणार आहेत. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एटीएफच्या किमतीत झालेली ही पाचवी वाढ आहे.
सार्वजनिक क्षेत्रातीलपेट्रोलियम कंपन्यांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीमध्ये एटीएफ (oil Marting Comapanies) चि किंमत 3.2 टक्यांनी वाढून 93,530 रुपये प्रति किलोमीटर झाली आहे. ही एटीएसचि सर्वोच्च पातळी आहे. ऑगस्ट 2008 मध्ये ATF ची किंमत 71,028. 26 रुपये प्रति किलोलिटर होती.
जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 147 डॉलरवर पोहोचली. मंगळवारी ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर व्यापार करत होते. तेल कंपन्या (Oil Company) दर पंधरवड्याला हवाई इंधनाच्या किंमातींचा आढावा घेतात, असे मानले जाते की 15 मार्चला आढावा घेतला जाईल तेव्हा हवाई इंधनाच्या किंमती पुन्हा वाढू शकतात.
सरकारी तेल कंपण्याना पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधनाच्या किमती ठरवण्याचा अधिकार आहे. या कंपन्या हवाई इंधनाच्या किमतीत सारखीच वाढ करत आहेत, मात्र उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जात नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.