Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM-Kisan 17th installment: 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मोठी भेट; मोदींनी पीएम किसानचा 17 वा हप्ता केला जारी

PM-Kisan 17th installment: सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पहिली मोठी भेट दिली आहे.

Manish Jadhav

PM-Kisan 17th installment: सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पहिली मोठी भेट दिली आहे. वास्तविक, पंतप्रधानांनी वाराणसीमध्ये पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी केला. याअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता पाठवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ज्या पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली ती 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी'च्या 17 व्या हप्त्याशी संबंधित होती.

वाराणसीतून 17वा हप्ता पाठवला

पंतप्रधान मोदींनी मंगळवारी त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीला भेट दिली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वाराणसी दौरा आहे. या कालावधीत, पंतप्रधान मोदींनी सुमारे 9.26 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 20,000 कोटी रुपयांहून अधिकचे हप्ते जारी केले आहेत.

योजनेची डिटेल

PM-KISAN हा 2019 मध्ये सुरु केलेला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) उपक्रम आहे. याअंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी वार्षिक 6,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. योजना सुरु झाल्यापासून केंद्राने देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 3 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: रात्री-अपरात्री पोलिस धडकणार घरी! 'गोव्या'त गुन्हेगारांवर करडी नजर; आठ दिवसांत १०५ जणांची चौकशी

Goa Crime: 'पूजा नाईक'च्या ताब्यातील आणखी चार कारगाड्या जप्त! म्हार्दोळ पोलिसांनी आवळल्या 'एजंट'च्या मुसक्या

Kalasa Banduri Project: 'कळसा-भांडुरा'बाबतीत कर्नाटकच्या अडचणी वाढल्या! आता ‘प्रवाह'च्या बैठकीकडे लक्ष

Rashi Bhavishya 25 October 2024: शत्रूंपासून सावधान! प्रवासादरम्यान होऊ शकते मोठी फसवणूक; जाणून घ्या काय सांगतयं या राशीचं भविष्य

अन्.. विठूरायाच्या दर्शनाचे स्वप्न राहिले अपुरे..! डिचोलीच्या बाजारात कोसळून वृद्धा मृत्यूमुखी

SCROLL FOR NEXT