Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Kisan Credit Card Scheme: 3 कोटी शेतकऱ्यांना लागली लॉटरी, सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला दिले एवढे लाख!

Kisan Credit Card: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) सह अनेक योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी सुरु केल्या आहेत.

Manish Jadhav

Kisan Credit Card: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) सह अनेक योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी सुरु केल्या आहेत.

शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी सरकारकडून किसान क्रेडिट कार्ड योजना (KCC योजना) चालवली जात आहे.

अलीकडेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी PSU बँकांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत पीएम किसान निधीच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड जारी करण्याचे आदेश दिले होते.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते

देशातील सर्वात कमी व्याजदरात या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, KCC कर्जाच्या रकमेत सरकारकडून सबसिडीही जाहीर केली जाते.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजाने पैसे मिळतात. शेतीच्या कामात गरज पडेल तेव्हा बहुतांश शेतकरी त्यातून पैसे घेतात. शेतकऱ्यांना (Farmers) सावकारांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली.

ही रक्कम 4 टक्के दराने उपलब्ध आहे

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 7 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. जर शेतकऱ्याने कर्जाची रक्कम वेळेवर परत केली तर शेतकऱ्याला व्याजदरात 3 टक्के सूट दिली जाते.

म्हणजेच कर्जाच्या रकमेवर फक्त 4 टक्के व्याज राहते. आगामी काळात देशातील सर्व पीएम किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा देण्याचा सरकारचा (Government) प्रयत्न आहे.

3 कोटींहून अधिक शेतकरी या योजनेत सामील झाले

जुलै 2022 पर्यंत, सरकारच्या एका विशेष मोहिमेअंतर्गत, 3 कोटींहून अधिक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेशी जोडले गेले आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 18 ते 75 वर्षे वयोगटातील व्यक्ती अर्ज करु शकतात. KCC मध्ये, शेतकऱ्यांना खते, बियाणे, कृषी यंत्रे, मत्स्यपालन, पशुपालन यासह अनेक आवश्यक गोष्टींसाठी कर्ज मिळते.

यामध्ये एका शेतकऱ्याला कमाल 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. येत्या काही दिवसांत ही रक्कम सरकारकडून 5 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

याप्रमाणे अर्ज करा

पीएम किसानच्या वेबसाइटवर किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म देण्यात आला आहे. तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर फॉर्म भरा आणि कोणत्याही बँकेत सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड

  • कृषी दस्तऐवज

  • अर्जदाराचा फोटो

  • रेशनकार्ड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT