Ration Card Holder
Ration Card Holder Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: मोफत रेशन घेणाऱ्यांना 'ही' चूक पडू शकते महागात, 1 तारखेपासून गहू-तांदूळ...!

Manish Jadhav

Ration Card Aadhaar Card Linking: तुमच्याकडेही रेशनकार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

केंद्र सरकार रेशनकार्डशी आधार लिंक करण्याची मागणी करत आहे. मात्र आजपर्यंत कोट्यवधी राशनकार्डे आधारशी लिंक केलेली नाहीत.

जर तुमचे रेशनकार्ड आधारशी लिंक नसेल तर सरकार तुमचे रेशनकार्ड रद्द करेल. यापूर्वी, त्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 होती. जी आता 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

रेशनकार्ड आपोआप रद्द होईल

जर 30 जून 2023 पर्यंत रेशनकार्ड (Ration Card) आणि आधार लिंक केले नाही तर तुमचे रेशनकार्ड आपोआप रद्द होईल आणि तुम्हाला 1 जुलैपासून रेशनमध्ये गहू-तांदूळ मिळणार नाही.

रेशनकार्ड रद्द केल्याने तुम्हाला आणखी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वास्तविक, पासपोर्ट आणि पॅन कार्ड व्यतिरिक्त, रेशनकार्ड ओळख आणि एड्रेस प्रूफ म्हणून वापरले जाऊ शकते.

हे काम 30 जून 2023 पर्यंत पूर्ण करा

रेशनकार्डशी आधार लिंक केल्याने सरकार एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त रेशनकार्डे मिळण्यापासून रोखू शकेल.

याद्वारे, अशा लोकांना ओळखता येईल, जे उच्च उत्पन्न मर्यादेमुळे रेशन मिळण्यास अपात्र आहेत. हे देखील सुनिश्चित करता येईल की, केवळ पात्र लोकांनाच अनुदानित गॅस किंवा रेशन मिळेल.

त्याचबरोबर, दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्याने डुप्लिकेट रेशनकार्ड आणि मध्यस्थांची मनमानी संपण्यास मदत होईल. तुम्ही अद्याप तुमचे रेशनकार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर कोणत्याही परिस्थितीत हे काम 30 जून 2023 पर्यंत पूर्ण करा.

रेशनकार्ड आधारशी ऑनलाइन कसे लिंक करावे

सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

आधार कार्ड क्रमांक, रेशनकार्ड क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल फोन नंबर यासारखे तपशील प्रविष्ट करा.

यानंतर Continue टॅबवर क्लिक करा.

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जाईल.

ओटीपी टाकून रेशनकार्ड-आधार कार्ड (Aadhar Card) लिंकवर क्लिक करा.

याप्रमाणे ऑफलाइन लिंक करा

रेशनकार्डचे फोटोस्‍टेट सोबत कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारकार्डचे फोटोस्‍टेट घ्या.

जर तुमचे आधार बँक खात्याशी लिंक केलेले नसेल तर बँक पासबुकचे फोटोस्‍टेट देखील घ्या.

यानंतर, कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो घ्या आणि तो संबंधित कार्यालय किंवा सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) किंवा रेशन दुकानात जमा करा.

आधार डेटाबेससाठी ती माहिती प्रमाणित करण्यासाठी तुम्हाला सेन्सरवर फिंगरप्रिंट आयडी देण्यास सांगितले जाईल.

विभागाला कागदपत्रे मिळाल्यानंतर तुम्हाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे कळवले जाईल.

संबंधित प्राधिकरण तुमच्या कागदपत्रांसह पुढील प्रक्रिया पूर्ण करेल. यानंतर, रेशनकार्ड आणि आधार लिंक झाल्यावर तुम्हाला कळवले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT