PM Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाबाबत मोदी सरकारने दिली मोठी अपडेट, अर्थ राज्यमंत्री म्हणाले...

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच बंपर वाढ होणार आहे.

Manish Jadhav

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच बंपर वाढ होणार आहे.

केंद्र सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ करण्याचा विचार करत आहे, मात्र या बातमीपूर्वीच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

सध्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळत आहे, मात्र आता 8 व्या वेतन आयोगाबाबत एक मोठी अपडेट आली आहे.

8 व्या वेतन आयोगाबाबत अपडेट

गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की, सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करु शकते. मात्र आता 8 व्या वेतन आयोगाबाबत सरकारकडून (Government) मोठी अपडेट देण्यात आली आहे. मोदी सरकारमधील अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत यासंदर्भातील स्थिती स्पष्ट केली.

महागाई भत्त्यात दुपटीने वाढ झाली आहे

केंद्र सरकारने 2014 मध्ये 7 वा वेतन आयोग जारी केला होता आणि सध्या कर्मचाऱ्यांना (Employees) त्यानुसार वेतन मिळते. यासोबतच महागाई भत्त्यातही वर्षातून दोनदा वाढ केली जाते. सध्या 8 वा वेतन आयोग आणण्यास सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. सरकारकडे सध्या अशी कोणतीही योजना नाही.

राज्यसभेतही स्थिती स्पष्ट झाली

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबत राज्यसभेत स्पष्टीकरण दिले. साधारणपणे, वेतन आयोग 10 वर्षातून एकदा आणला जातो आणि 10 वर्षापूर्वी त्याचा विचार करण्याची कोणतीही योजना नाही. सध्या केंद्र सरकारकडून यापूर्वीही अनेकदा सांगण्यात आले आहे की, आम्ही परफॉर्मन्सवर आधारित प्रणाली आणण्याचा विचार करत आहोत.

परफॉर्मन्सनुसार पगार वाढेल

परफॉर्मन्स आधारित प्रणालीमध्ये, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामानुसार रेटिंग मिळेल आणि त्या आधारावर पगारात वाढ होईल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देण्यात येणारे वेतन, भत्ते आणि पेन्शनच्या रचनेत बदल करण्यासाठी नवीन आयोग स्थापन करण्याची गरज नाही.

पगाराचा आढावा कोणत्या आधारावर घेतला जाईल?

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्वतः संसदेत आधीच सांगितले आहे की, आयक्रोयड फॉर्म्युल्याच्या आधारे सर्व भत्ते आणि पगारांचा आढावा घेतला जाऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT