PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Account Rules: बँक खाते उघडण्याच्या नियमात बदल करणार मोदी सरकार, जाणून घ्या काय आहे नवी तरतूद?

Bank Account and Sim Card Rules: ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी सरकार आता एक नवीन नियम आणण्याचा विचार करत आहे.

Manish Jadhav

Bank Account Rules: बँक खाते उघडणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमचाही येत्या काही दिवसांत बँक खाते उघडण्याचा विचार असेल तर लवकरच सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल केला जाऊ शकतो.

देशभरात वेगाने वाढणारी ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी सरकार आता एक नवीन नियम आणण्याचा विचार करत आहे, ज्याअंतर्गत बँक खाते उघडणे आणि नवीन सिमकार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कठोरता आणली जाणार आहे.

ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत

सध्या देशभरात ऑनलाइन फसवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बँक खात्यांमधील फसवणूक रोखण्यासाठी सरकार (Government) लवकरच नवीन नियम आणू शकते. नवीन नियमानुसार, मोबाईल सिम घेणे आणि बँक खाते उघडणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. यासोबतच इतर कोणत्याही व्यक्तीचा तपशील वापरता येणार नाही.

EKYC आवश्यक असेल

मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काळात टेलिकॉम ऑपरेटर आणि बँकांना ग्राहकांचे फिजिकल व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य केले जाऊ शकते.

सध्या, जेव्हा जेव्हा कोणी बँक (Bank) खाते उघडण्यासाठी आणि सिमकार्ड मिळविण्यासाठी अर्ज करतो तेव्हा ऑनलाइन ई-केवायसीद्वारे आधारवरुन तपशील घेऊन त्याची पडताळणी केली जाते.

सिमकार्ड सहज उपलब्ध आहे

मागील काही महिन्यांपासून बँक फसवणुकीची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत, ज्याचे सर्वात मोठे कारण समोर आले आहे की, लोकांना सिमकार्ड सहज मिळतात आणि लोक नवीन नंबर घेऊन त्यांच्या योजना पूर्ण करतात.

त्यानंतर ते बंद करतात. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या अहवालानुसार, बँक फसवणूक प्रकरणांमध्ये 41,000 कोटींहून अधिक रुपयांचा समावेश आहे.

नवीन नियम जारी केले जातील

आता सरकार नवीन सिमकार्ड देण्याची आणि बँक खाते उघडण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याच्या तयारीत आहे. यासाठी केवायसी नियम कडक करण्याचा विचार केला जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकार टेलिकॉम ऑपरेटर्स आणि बँकांना लवकरच नवीन नियम लागू करण्यास सांगू शकते. गृह मंत्रालयाने या विषयावर वित्त आणि दूरसंचार मंत्रालयासोबत आढावा बैठकही घेतली आहे. या निर्णयाच्या रोडमॅपवरही बैठकीत चर्चा झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

SCROLL FOR NEXT