PM Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

Government Scheme: अखेर मोदी सरकारने ऐकले! निवडणुकीपूर्वी महिलांसाठी लॉन्च केली खास योजना

Mahila Samman Saving Certificate: मोदी सरकार जनतेसाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांमध्ये विविध श्रेणीतील लोकांना मदत केली जात आहे.

Manish Jadhav

Mahila Samman Saving Certificate: मोदी सरकार जनतेसाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांमध्ये विविध श्रेणीतील लोकांना मदत केली जात आहे.

त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या वर्षभरापूर्वी मोदी सरकारने एक महत्त्वाची योजना सुरु केली आहे.

या योजनेबाबत 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनीही घोषणा केली होती. मोदी सरकारने आता खास महिलांसाठी ही योजना सुरु केली आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची घोषणा केली होती. ही योजना महिला आणि मुलींसाठी एक नवीन अल्प बचत योजना आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर करण्यात आली. मोदी सरकारने लॉन्च केलेले महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 1 एप्रिल 2023 पासून सुरु झाले आहे. या योजनेत सरकारकडून (Government) वार्षिक 7.5% व्याजदर उपलब्ध आहे.

इतक्या वर्षांची योजना

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एप्रिल 2023 ते मार्च 2025 या दोन वर्षांसाठी एक वेळची योजना उपलब्ध आहे.

यामध्ये महिला किंवा मुलींच्या नावे दोन वर्षांसाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये निश्चित व्याजदरावर ठेवण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र फक्त मुलीच्या किंवा महिलेच्या नावाने बनवता येते. महिला किंवा अल्पवयीन मुलीचे पालक महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना उघडू शकतात.

जमा केलेली रक्कम

दुसरीकडे, महिला सन्मान बचत प्रमाणपत्रांतर्गत, किमान ठेव रक्कम 100 रुपयांच्या पटीत रु. 1000 आहे. खातेदाराच्या एका खात्यात किंवा सर्व महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खात्यांमध्ये जास्तीत जास्त ठेव रक्कम रु.2 लाखांपेक्षा जास्त नसावी.

सध्याचे खाते उघडण्याच्या तारखेपासून किमान तीन महिन्यांच्या अंतरानंतर महिला किंवा मुलीचे पालक दुसरे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडू शकतात.

पैसे काढणे

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खात्याचा परिपक्वता कालावधी दोन वर्षांचा आहे. अशा प्रकारे खाते उघडल्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी खातेदाराला मॅच्युरिटी रक्कम दिली जाईल.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत आंशिक पैसे काढण्याची सुविधा प्रदान केली जाते. खातेदार खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर खात्यातील शिल्लक रकमेच्या 40% पर्यंत काढू शकतात.

आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत लहान बचत योजना सामान्यतः कर लाभांसाठी पात्र असतात. मात्र, या योजनेची कर आकारणी अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT