Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

Senior Citizens साठी आली मोठी बातमी, मोदी सरकार देणार दरमहा 5 हजार रुपये!

Manish Jadhav

Atal Pension Yojana: केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत, ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत मिळते. या सगळ्यात केंद्र सरकारने करोडो लोकांना आनंदाची बातमी दिली आहे.

सरकारने अशी योजना बनवली आहे, ज्याद्वारे दरमहा तुमच्या खात्यात 5000 रुपये येणार आहेत. विशेष म्हणजे, वृद्धापकाळापर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात येत राहतील. चला तर मग मोदी सरकारच्या या खास योजनेबद्दल जाणून घेऊया...

पैसे थेट खात्यात येतील

सरकारकडून (Government) अटल पेन्शन योजनेत तुम्हाला ही सुविधा मिळेल. तुमच्या वृद्धापकाळासाठी भारत सरकारद्वारे चालवली जाणारी ही योजना आहे. या योजनेत तुम्हाला 60 वर्षांनंतर दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळू शकते आणि हे पैसे थेट तुमच्या खात्यात येतील.

अटल पेन्शन योजना काय आहे?

अटल पेन्शन योजना खास तुमच्या वृद्धापकाळासाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना भारत सरकार चालवते. वृद्धापकाळात लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेत तुम्ही अल्प रक्कम जमा करुन पेन्शन फंड जमा करु शकता.

कोण गुंतवणूक करु शकतो

या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोकच या योजनेत गुंतवणूक (Investment) करु शकतात. 60 वर्षांनंतर तुम्हाला 5000 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. यामध्ये तुम्हाला 20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.

मला 5000 रुपये कधी मिळतील

या योजनेत तुम्हाला 60 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 1454 रुपये जमा करावे लागतील आणि 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1000 ते 5000 रुपये मिळतील.

आपण कुठे खाते उघडू शकतो

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. तुम्ही जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडू शकता. आणि दर महिन्याला गुंतवणूक करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT