1000 Rupees Dainik Gomantak
अर्थविश्व

Old 1000 Rupee Note: 1000 रुपयाच्या नोटेबाबत सरकार घेऊ शकते मोठा निर्णय, रिपोर्ट्सनुसार...

1000 Rupees Note: नोटबंदीनंतर चलनी नोटांबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत, मात्र आता जुन्या 1000 रुपयांच्या नोटेबाबत मोठी बातमी आली आहे.

Manish Jadhav

Will Govt bring back 1000 Note?: नोटबंदीनंतर चलनी नोटांबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत, मात्र आता जुन्या 1000 रुपयांच्या नोटेबाबत मोठी बातमी आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार ही नोट पुन्हा सुरु करु शकते. नोटाबंदीच्या वेळी सरकारने ही नोट बंद करुन देशातील भ्रष्टाचाराला आळा घातला असल्याचा दावा केला होता.

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने अशा नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता सरकार पुन्हा एकदा 1000 रुपयाची नोट सुरु करणार आहे.

नोट पुन्हा जारी केली जाऊ शकते

ज्या उद्देशाने सरकारने (Government) या नोटबंदी केली होती, तो उद्देशही बऱ्याच अंशी सफल झाला आहे. सध्या बातम्या येत आहेत की, सरकार पुन्हा एकदा 1000 रुपयाची नोट जारी करु शकते. 20216 मध्ये सरकारने 1000 रुपयाची नोट बंद करुन 2000 रुपयाची नोट जारी केली.

बाजारातून 2000 च्या नोटा गायब

नोटाबंदीच्या वेळी लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यावेळी लोकांना नोटा बदलून घेण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याचा त्रास सहन करावा लागत होता. सध्या बाजारात 2000 रुपयांच्या नोटा खूपच कमी दिसत आहेत.

आरबीआयचा अहवाल समोर आला आहे

RBI च्या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की, 31 मार्च 2022 पर्यंत 2,000 रुपयांच्या एकूण 214.20 कोटी नोटा (2000 रुपयांची नोट) चलनात होत्या. हे एकूण नोटांच्या 1.6% आहे. मूल्यावर नजर टाकल्यास एकूण 4,28,394 कोटी रुपयांच्या नोटा चलनात आहेत. मूल्याच्या बाबतीत, 13.8% नोटा अस्तित्वात आहेत.

2016 मध्ये नोटबंदी करण्यात आली

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशात नोटाबंदीची घोषणा केली होती. यानंतर त्याच दिवशी मध्यरात्रीपासून देशात 500 आणि 1000 रुपयांच्या चलनावर बंदी घालण्यात आली. मात्र, यानंतर लोकांना बँकेतून नोटा बदलून देण्याची परवानगी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT