PM Modi 
अर्थविश्व

PM Modi Government: पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारताच मोदींचा मोठा निर्णय, PM किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी

PM Kisan Samman Yojana: तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिला मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांनी त्यांच्या पहिल्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे.

Manish Jadhav

PM Kisan Samman Yojana: तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. PM किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता म्हणून 20 हजार कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. बरेच दिवस शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते. फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पीएम मोदी म्हणाले की, आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच पहिली फाइल शेतकरी हिताची होती. आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे.

दरम्यान, 2019 मध्ये सुरु करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करते. ही रक्कम दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरीत केली जाते, जी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. अंतरिम अर्थसंकल्पानुसार, सरकारने कृषी मंत्रालयासाठी 2024-25 साठी 1.27 लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, जी आर्थिक वर्ष 2023-24 च्या तुलनेत किंचित जास्त आहे. संपूर्ण अर्थसंकल्प जुलै 2024 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

16 वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी जारी केला होता

पीएम किसान सन्मान योजना देशातील सर्व जमीनधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शेती आणि संबंधित काम तसेच त्यांच्या घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु करण्यात आली, परंतु ती डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली. यापूर्वी, देशाच्या पंतप्रधानांनी 28 फेब्रुवारी रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 16 वा हप्ता जारी केला होता. 16 व्या हप्त्यात 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जारी करण्यात आली होती.

मोदी मंत्रिमंडळ ॲक्शन मोडमध्ये

मोदी मंत्रिमंडळाने रविवारी शपथ घेतल्यानंतर सोमवारी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. हे दोन्ही निर्णय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घेण्यात आले आहेत. मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दोन कोटी अतिरिक्त घरांना मंजुरी मिळू शकते. त्याचवेळी, आणखी एका महत्त्वाच्या निर्णयानुसार, या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीत सुमारे 50 टक्के वाढ केली जाऊ शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी राष्ट्रपती भवनात आपल्या नवीन मंत्रिमंडळासोबत शपथ घेतली. मोदी सरकार 3.0 मधील एकूण मंत्र्यांची संख्या 72 आहे, त्यापैकी 30 मंत्री मंत्रिमंडळाचा भाग असतील. याशिवाय 5 मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. त्याचबरोबर 36 खासदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. अशा अनेक मंत्र्यांचा मोदी मंत्रिमंडळ 3.0 मध्ये समावेश करण्यात आला आहे, जे मोदी सरकार 2.0 मध्ये देखील मंत्री होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT